Mumbai: अखेर आर्यन खानला अटक; आजचा मुक्काम जेल मध्येच Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai: अखेर आर्यन खानला अटक; आजचा मुक्काम जेल मध्येच

मुंबईहून गोव्याकडे (Mumbai To Goa) जाणाऱ्या लक्झरी क्रूझमध्ये (Cruz Drugs Party) ड्रग पार्टी होत होती, ज्यावर NCB ने धाड टाकली आहे.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबईहून गोव्याकडे (Mumbai To Goa) जाणाऱ्या लक्झरी क्रूझमध्ये (Cruz Drugs Party) ड्रग पार्टी होत होती, ज्यावर NCB ने धाड टाकली आहे. बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा (Aryan Khan) मुलगा आर्यनचे नावही पार्टीमध्ये समोर आले आहे. आता आर्यन खान सह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्याचबरोबर आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. मूनमून धमेचा, नुपूर सारिका, यास्मित सिंग, मोहक जयस्वाल, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा, आर्यन खान, अरबाज मर्चंट या आठ जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्याची एनसीबी टीमकडून चौकशी केली. एनसीबी मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आर्यनच्या चौकशीला दुजोरा दिला होता. त्यांनी सांगितले आहे की ज्या लोकांची चौकशी केली जात आहे. त्यात शाहरुखचा मुलगा आर्यनचा समावेश आहे.

एनसीबीच्या चौकशीत आर्यनने असाही दावा केला आहे की, त्या पार्टीमध्ये त्याला आमंत्रित करण्यात आले होते. सूत्रांनी असेही सांगितले की क्रूझच्या आत जात असलेल्या पार्टीचा एक व्हिडिओ एनसीबीने मिळाला आहे, ज्यामध्ये आर्यन दिसत आहे. पार्टी दरम्यान आर्यनने पांढरा टी-शर्ट, निळी जीन्स, लाल ओपन शर्ट आणि टोपी घातली होती. एनसीबीशी संबंधित सूत्रांकडून असेही समजले आहे की ज्यांना पकडले गेले आहे, त्यांच्याकडून रोलिंग पेपर देखील सापडले आहेत.

मोबाईल फोन जप्त, एनसीबी चॅट्स तपासत आहे.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शाहरुखचा मुलगा आर्यनचा मोबाईल जप्त केला आहे. त्याच्या मोबाईलवरून मिळालेल्या चॅट्सची छाननी केली जात आहे. असे सांगितले जात आहे की ज्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या उर्वरित लोकांचे मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आले आहेत आणि त्यांची चौकशी केली जात आहे. या प्रकरणी दिल्लीहून आलेल्या तीन मुलींनाही ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. तिन्ही बड्या उद्योगपतींच्या मुली सांगितल्या जात आहेत. एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयातून संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवले जात आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की हा तपास कायद्याच्या कक्षेत राहूनच केला जात आहे. ज्याचा यात समावेश आहे त्याच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती एनसीबीकडून दिली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT