ATM Saam Tv
मुंबई/पुणे

ATM मधील पैसे चुटकीसरशी करायचा गायब; चोराची अनोखी शक्कल पाहून पोलीसही चाट पडले

ATM Fraud News: एटीएममधून पैसे चोरीसाठी भामट्याने एक अनोखी शक्कल लढवली आहे. ग्राहकांना आपले पैसे कसे गायब व्हायचे हे देखील कळायचे नाही. एटीएममधून पैसे चोरण्यासाठी चोर गमचा वापर करत असे. बोरिवली पोलिसांनी याप्रकरणी २१ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Borivali ATM Fraud News:

एटीएममधून पैसे चोरीसाठी भामट्याने एक अनोखी शक्कल लढवली आहे. ग्राहकांना आपले पैसे कसे गायब व्हायचे हे देखील कळायचे नाही. एटीएममधून पैसे चोरण्यासाठी चोर गमचा वापर करत असे. बोरिवली पोलिसांनी याप्रकरणी २१ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. हिंमाशू तिवारी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हिंमाशू पैसे वितरणाच्या (Cash Dispensation Slot) स्लॉटला गम चिटकवायचा. जेणेकरुन ग्राहकांना एटीएममधून पैसे काढता येऊ नये. ग्राहकांनी एटीएममधून काढलेल्या नोटा मशिनमध्येच अडकून राहत असे. त्यामुळे ग्राहकाला पैसे काढता येत नसे. त्यानंतर ग्राहक एटीएममधून बाहेर पडताच आरोपी एटीएममध्ये जाऊन टूल्सच्या मदतीने पैसे काढायचा आणि तिथून पळ काढायचा.

ट्रॅव्हल एजंट शकीफ शेख यांना देखील असाच अनुभव आला होता. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी याबाबत तपास करत आरोपी हिमांशू तिवारीला अटक केली. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

शफीक २२ नोव्हेंबरला सकाळी बोरीवली पूर्व येथील एमजी रोडवरील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी एटीएममधीन पैसे काढले, पण पैसे बाहेर आलेच नाहीत. मात्र बँकेतून ५००० डेबिट झाल्याचा मेसेज फोनवर आला. त्यांनी ही घटना विचित्र वाटली. काही वेळातच आपली फसवणूक झाली आहे हे शाफीक यांच्या लक्षात आले. त्यांनतर त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यावेळी हिमांशू सीसीटीव्ही कॅमेरात दिसला.

शफीक यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनीही तपासाची चक्र फिरवली आणि काही तासातच आरोपी हिमांशू याला अटक केली. त्यावेळी हिमांशूकडे चोरलेले पैसे सापडले. त्यासोबत एक नवीन एटीएम कार्ड आणि गमचा बॉक्सही जप्त केला. हिंमाशूचा आणखी काही चोरीच्या घटनांमध्ये समावेश आहे का याबाबतही पोलीस आता तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दिल्ली स्फोटानंतर देशातील सर्व विमानतळांना अलर्ट

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गट अन् राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र, सोलापुरातील राजकारण फिरणार

Chinmayee Sumeet : "होय मी जयभीमवाली..."; चिन्मयी सुमितचं बेधडक वक्तव्य

Shivani Rangole Photos: शिवानीचं मराठमोळं सौंदर्य! जांंभळ्या साडीत दिसतेय खूपच भारी

Liver damage: लिव्हर खराब होण्यापूर्वी हातावर दिसतात संकेत; डॉक्टरांनी सांगितली ५ महत्त्वाची लक्षणं

SCROLL FOR NEXT