मुंबई/पुणे

Mumbai Boat Accident : धक्कादायक! गेटवेकडून एलिफंटाला जाणारी ३० प्रवाशांची बोट उलटली, मुंबईतील घटना

Gateway of India News : गेटवेकडून एलिफंटाला जाणारी बोट उलटल्याची घटना घडली. या बसमध्ये ३० ते ३५ प्रवासी होते. या प्रवाशांना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरु करण्यात आलं आहे.

Vishal Gangurde

गणेश कवडे, साम टीव्ही

मुंबई : मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ भयंकर घटना घडली आहे. गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटाला जाणारी बोट उलटल्याची घटना घडली आहे. या बोटमध्ये ३० ते ३५ प्रवासी होते. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या भयंकर प्रकारानंतर प्रवाशांसाठी बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या गेटवेजवळ मोठी दुर्घटना घडली. गेटवेहून एलिफंटाला जाणाऱ्या ३० ते ३५ प्रवाशांची बोट उलटल्याची घटना घडली आहे. ही बोट उलट्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली. बोट उलटल्यानंतर जीवरक्षक तातडीने घटनास्थळी पोहोचले. या जीवरक्षकाकडून तातडीने प्रवाशांना पाण्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले.

एलिफंटाकडे दररोज पर्यटकांचा ओढा असतो. त्यामुळे दररोज शेकडो लोक एलिफंटा या ठिकाणी जात असतात. या बोटमधील प्रवासी पाण्यात पडल्यानंतर जीवरक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात कोणत्याही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबईच्या गेट ऑफ इंडियाकडून एलिफंटा गुफा पाहण्यासाठी हजारो जण जात असतात. बुधवारी दुपारी पर्यंटकांनी भरलेल्या दोन बोटी एलिफंटाच्या दिशेने निघाल्या होत्या. या दोन बोटींची समोरासमोर धडक झाली. या धडकेत बोट उलटली. या घटनेनंतर तातडीने जीवरक्षक मदतीसाठी पोहोचले. या जीवरक्षकांनी तातडीने प्रवाशांना लाइफ जॅकेट दिले. या दुर्दैवी घटनेत ३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

उलटलेल्या बोटीचे नाव नीलकलम असे आहे. उरण, कारंजा परिसरात बोट उलटल्याची माहिती हाती आली आहे. नेव्ही, जेएनपीटी, कोस्टगार्ड, पोलीस आणि स्थानिक मच्छिमार यांच्या साहाय्याने बचावकार्य सुरु करण्यात आलं. या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. ही दुर्घटना घडताच परिसरातील इतर बोटी घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी बचावकार्य सुरु केलं. आतापर्यंत या घटनेतील ६६ प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे. तर तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Atal Pension Yojana: या सरकारी योजनेत दर महिन्याला मिळते ₹५०००; गुंतवणूकीचं संपूर्ण कॅल्क्युलेशन वाचा

Vaidehi Parshurami Photos: लाल साडीत खुललंं वैदेही परशुरामीचं सौंदर्य, फोटो पाहा

Vande Bharat Train : मोठी बातमी! देशात आणखी ४ वंदे भारत ट्रेन सेवेत, जाणून घ्या तुमच्या शहरातून धावणार का?

SCROLL FOR NEXT