Allegations of massive corruption surface in BMC’s ₹478 crore security guard tender, raising serious concerns over fake attendance and deployment of criminal-background personnel. saam tv
मुंबई/पुणे

मुंबई महापालिकेला भ्रष्टाचाराचा विळखा? खासगी सुरक्षा रक्षकांच्या निविदेत महाघोटाळा?

BMC Security Guard Tender Scam Details: मुंबई महापालिकेच्या खासगी सुरक्षा रक्षकांच्या शेकडो कोटींच्या निविदेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. त्यानंतर सत्ताधाऱ्यासह विरोधकांनी थेट पालिका प्रशासनाला धारेवर धरलंय. मात्र, महापालिकेचे कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप नेमका कुणी केलाय? पाहूयात यावरचा एक रिपोर्ट...

Saam Tv

रोहित कदम, साम टीव्ही

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची मालिका काही थांबायचं नाव घेत नाहीये. महापालिकेच्या खासगी सुरक्षा रक्षकांच्या शेकडो कोटींच्या निविदेमध्ये कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय. शिक्षण आणि सुरक्षा विभागासाठी खासगी सुरक्षा रक्षक आणि मदतनीस पुरवण्यावरून आर्थिक गैरव्यवहार माहिती अधिकारात उघडकीस आलाय. नेमका काय घोटाळा आहे ते पाहूयात..

मुंबई महापालिकेच्या शिक्षण आणि सुरक्षा विभागासाठी खासगी सुरक्षा रक्षक आणि मदतनीस पुरवण्याच्या 478 कोटींच्या निविदेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आलाय. आर्थर रोड कारागृहात असलेले कैदी आणि परदेशात गेलेल्या व्यक्तींनाही ड्युटीवर उपस्थित दाखवून 120 कोटींची बिले उचलण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. विशेष म्हणजे, यावेळी पोलीस चारित्र्य पडताळणीची अटही पाळण्यात आलेली नाही. इतकंच नव्हे तर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना शाळा आणि रुग्णालयांसारख्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्त करण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय.

या प्रकरणाची आता तक्रार महापालिका आयुक्तांकडे करण्यात आलीये. एव्हंढच नाहीतर, एसआयटी आणि आर्थिक गुन्हे शाखेमार्फत या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी देखील केली जातेय. तर दुसरीकडे, महापालिकेच्या भोंगळ कारभारावर सत्ताधारी भाजपनं कारवाईची मागणी केलीये. विरोधकांनीही प्रशासनाला धारेवर धरलंय.

निविदेनुसार बायोमेट्रिक किंवा डिजिटल हजेरी बंधनकारक असताना सर्व हजेरी पत्रके हस्तलिखित तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. याच माध्यमातून आर्थर रोड जेलमध्ये असलेल्या व्यक्ती आणि दुबईमध्ये असलेल्या तरुणालाही महापालिकेच्या ड्युटीवर उपस्थित दाखवण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. त्यामुळे महापालिकेच्या सुरक्षा यंत्रणेमध्येच जर गुन्हेगार, बनावट हजेरी आणि नियमबाह्य देयकांचे आरोप होत असतील, तर हा केवळ आर्थिक घोटाळ्याचा विषय नाही, तर नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न आहे. आता या आरोपांवर महापालिका प्रशासन काय भूमिका घेते आणि या कथित घोटाळ्याची चौकशी होते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat : पोटावरची अतिरिक्त चरबी वाढवते 'या' गंभीर आजारांचा धोका, दुर्लक्ष करणे पडेल महागात

महाबळेश्वरच्या पिकनिकचा भयानक शेवट! हायवेवर कारचा चक्काचूर, मावळच्या ४ मित्रांचा जागीच मृत्यू, दोघांची मृत्यूशी झुंज

Maharashtra News Live Update: कराडला मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताचे बॅंनर फाडले

Mumbai Local: मुंबईत धावत्या लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू, गर्दीमुळे हात सटकला अन् थेट खाडीत पडला

Urine Infection : लहान मुलांना युरिन इन्फेक्शन झाले तर शरीर देते 'हे' संकेत; पावसाळ्यात वेळीच उपचार करा, नाहीतर...

SCROLL FOR NEXT