BMC Birth Death Certificate News  AI Image
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! जन्म-मृत्यू प्रमाणपत्राच्या अर्जाची माहिती आता थेट SMSवर

BMC Birth Death Certificate Update News : मुंबई महानगरपालिकेने जन्म-मृत्यू नोंदणी आणि प्रमाणपत्र दुरुस्ती सेवांसाठी OTP व SMS सुविधा सुरू केली आहे. अर्ज क्रमांक, मंजुरी-नामंजुरी आणि प्रमाणपत्र जारी झाल्याची माहिती आता SMSद्वारे मिळणार.

Alisha Khedekar

  • BMCने जन्म-मृत्यू नोंदणी सेवांसाठी OTP आणि SMS सुविधा सुरू केली

  • अर्जदाराच्या मोबाईल क्रमांकाची OTPद्वारे पडताळणी केली जाणार

  • अर्ज मंजूर किंवा नामंजूर झाल्याची माहिती SMSद्वारे कळवली जाणार

मुंबई महानगरपालिकेने (BMC) नागरिकांसाठी जन्म व मृत्यू नोंदणी तसेच जन्म-मृत्यू प्रमाणपत्रातील दुरुस्तीशी संबंधित सेवांमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. नागरिक सुविधा केंद्रांमार्फत (CFC) दाखल करण्यात येणाऱ्या या अर्जांसाठी आता OTP आणि SMS आधारित सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज केल्यानंतर त्याची माहिती जाणून घेण्यासाठी नागरिकांना वारंवार पालिका कार्यालय किंवा नागरिक सुविधा केंद्राच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही.

कशी असेल प्रक्रिया?

या नव्या सुविधेअंतर्गत अर्ज सादर करताना अर्जदाराच्या मोबाईल क्रमांकाची OTPच्या माध्यमातून पडताळणी केली जाईल. अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित अर्जाचा Application Number थेट SMSद्वारे अर्जदाराच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवला जाणार आहे. यानंतर अर्जाच्या प्रक्रियेत होणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींची माहितीही SMSद्वारे देण्यात येईल. अर्ज मंजूर झाला आहे की नामंजूर, तसेच संबंधित जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध झाले आहे किंवा जारी करण्यात आले आहे, याची माहिती आवश्यकतेनुसार नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर मिळणार आहे.

नागरिकांचा वेळ वाचणार

सध्या शासकीय कागदपत्रांसाठी अर्ज केल्यानंतर त्याची स्थिती जाणून घेण्यासाठी नागरिकांना संबंधित कार्यालयात प्रत्यक्ष जावे लागते. मात्र BMCच्या या नव्या SMS सुविधेमुळे ही प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

घरबसल्या मिळणार अपडेट!

विशेषतः जन्म-मृत्यू नोंदणी, प्रमाणपत्रातील दुरुस्ती आणि संबंधित सेवांसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना अर्जाची सद्यस्थिती घरबसल्या समजू शकणार आहे. त्यामुळे वेळ, प्रवासाचा खर्च आणि अनावश्यक श्रम वाचण्यास मदत होणार आहे. BMCच्या या नागरिकाभिमुख उपक्रमामुळे जन्म व मृत्यू नोंदणीशी संबंधित सेवांमध्ये पारदर्शकता, सुलभता आणि वेळेवर माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. डिजिटल माध्यमांचा वापर वाढवत नागरिकांना अधिक सोयीस्कर सेवा देण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Digestive Health : पोट साफ होत नाही? 'ही' असू शकतात लक्षणे; जाणून घ्या कारणे आणि उपाय

Raigad Fort : तटबंदी नाही, बुरुज नाहीत; तरीही खास आहे रायगडचा 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात SIT स्थापन; २३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक

Cotton Saree Designs: महिलांसाठी कॉटन साड्यांचे लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न नवरात्री आणि करवा चौथसाठी ठरतील बेस्ट

Dombivli : डोंबिवलीत उच्चभ्रू सोसायटीत जोरदार हाणामारी; मारहाणीचे CCTV फुटेज व्हायरल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT