Vanchit Bahujan Aghadi leaders releasing the first list of candidates for the upcoming BMC Elections 2026 in Mumbai. saam tv
मुंबई/पुणे

BMC Elections: मुंबई महानगरपालिका निवडणूक; वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Vanchit Bahujan Aghadi Announces Candidate List: वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर केली आहे. यात नवीन चेहरे आणि महिला प्रतिनिधित्वाला प्राधान्य देण्यात आले आहे.

Bharat Jadhav

  • बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 साठी वंचितची पहिली यादी जाहीर

  • 10 उमेदवारांची घोषणा, नव्या कार्यकर्त्यांना संधी

  • उत्तर-पश्चिम ते दक्षिण-मध्य मुंबईतील प्रभागांचा समावेश

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ साठी वंचित बहुजन आघाडीने आपली कंबर कसली असून, उमेदवारांची पहिली अधिकृत यादी आज जाहीर केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील विविध प्रभागांतील १० नावांची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये नव्या निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे.

या पहिल्या यादीमध्ये मुंबईच्या उत्तर-पश्चिम, उत्तर-मध्य, ईशान्य आणि दक्षिण-मध्य अशा महत्त्वाच्या भागांतील उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या यादीत महिला उमेदवारांनाही मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.

मुंबईत राजकीय हालचालींना वेग

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर प्रस्थापित पक्ष अद्याप चाचपणी करत असतानाच, वंचित बहुजन आघाडीने आपली पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे.पहिल्या यादीत प्रामुख्याने ईशान्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईवर भर देण्यात आला आहे.उमेदवारांच्या नावांची घोषणा होताच संबंधित प्रभागांतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.

वंचित बहुजन आघाडी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक साठी जाहीर केलेल्या उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे -

- राहुल सुभाष ठोके , वॉर्ड क्रमांक 54,मुंबई उत्तर पश्चिम

- गौतम भीमराव हराल, वॉर्ड क्रमांक 160, उत्तर मध्य मुंबई

- स्वप्नील राजेंद्र जवळगेकर, वॉर्ड क्रमांक 169, उत्तर मध्य मुंबई

- सिमा निनाद इंगळे, वॉर्ड क्रमांक 114, ईशान्य मुंबई

- सुनिता अंकुश वीर, वॉर्ड क्रमांक 118, ईशान्य मुंबई

- चेतन चंद्रकांत अहिरे, वॉर्ड क्रमांक 119, ईशान्य मुंबई

- वर्षा कैलास थोरात, वॉर्ड क्रमांक 127, ईशान्य मुंबई

- सतिश वामन राजगुरु, वॉर्ड क्रमांक 146, दक्षिण मध्य मुंबई

- ज्योती स्वप्नील वाघमारे, वॉर्ड क्रमांक 155, दक्षिण मध्य मुंबई

- सुगंधा राजेश सोंडे, वॉर्ड क्रमांक 173, दक्षिण मध्य मुंबई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'भाजपचा वॉच, नगरसेवकांचे फोन टॅप'; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

Maval Politics: फॉर्म भरण्याच्या दिवशीच मावळात हाय व्होल्टेज ड्रामा; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; भाजप शिंदेसेनेविरोधात पोलिसात जाणार, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Fact check: कर्ज देणारा करोडपती भिकारी...; व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Maharashtra Politics: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार का? अजित पवारांच्या गटातील बड्या नेत्याचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT