Diwali Bonus For BMC Employees Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News: BMC कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, दिवाळीपूर्वी इतके रुपये मिळणार?

Diwali Bonus For BMC Employees: मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बीएमसीकडून कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे.

Priya More
  • मुंबई महानगरपालिकेकडून कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनसची घोषणा

  • बीएमसी कर्मचाऱ्यांना ३३ हजार रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार

  • बीएमसी कर्मचाऱ्यांच्या बोनस रकमेत मागच्या वर्षीच्या तुलनेत २ हजार रुपयांची वाढ

दिवाळीपूर्वी सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर केला जात आहे. नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, नाशिक महानगर पालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर केला. त्यापाठोपाठ आता मुंबई महानगर पालिकेने देखील आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा केली आहे. बीएमसीच्या कर्मचाऱ्यांना ३३ हजार रुपये बोनस मिळणार आहे. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे. बोनस जाहीर झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अधिकारी, कर्मचारी आणि कामगार यांना दीपावली २०२६ साठी बोनस जाहीर करण्यात आला आहे. आज मुंबईच्या महापौर रितू तावडे पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती देणार आहेत. मागच्या वर्षी मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना ३१,००० रुपये बोनस देण्यात आला होता.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या बोनसमध्ये तब्बल २००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना ३३,००० रुपये बोनस स्वरूपात मिळणार आहेत. त्यामुळे बीएमसी कर्मचाऱ्यांची दिवाळी दणक्यात होणार आहे. बोनसपोटी पालिकेच्या तिजोरीवर सुमारे ३०० कोटीं पेक्षा जास्त भार येणार आहे. बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी बोनसबाबतच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

दरम्यान, कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना २१ हजार रुपयांचा दिवाळी बोनस दिला जाणार आहे. तर आशा सेविकांना ६००० रुपये बोनस दिला जाईल. केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांनी दिवाळी बोनसची घोषणा केली. दिवाळीपूर्वी केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे.

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेत काम करणारे वर्ग १ आणि वर्ग २ चे अधिकारी आणि सर्व श्रेणीतील कामगार, ठोक पगारी, वाहन चालक, केडीएमटीचे कामगार, महापालिकेच्या शाळेतील शिक्षक, विविध आरोग्य योजनेसाठी काम करणारे कामगार या सर्वांना दिवाळीपूर्वी बोनस दिला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक जिल्ह्यातील आसखेड्यात विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका

Vande Bharat Train: पाहुण्यांना निरोप द्यायला गेले अन् ३६ हजारांचा दंड भरून आले! का बसला दंड? कुठे घडला हा प्रकार?

Plane Crash : हवेतच विमानाला आग, क्षणांत जमिनीवर कोसळून मोठा स्फोट; विमान दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू

Quad क्वाड परिषदेतील PM मोदींच्या कृत्यानं जिंकली अनेकांची मने; VIDEO व्हायरल

Wednesday Horoscope : बोलताना संयम ठेवा! ५ राशींच्या व्यक्तींना कामाच्या नव्या संधी मिळतील; वाचा आजचे राशी

SCROLL FOR NEXT