BMC News Social Media
मुंबई/पुणे

BMC News : ट्रॅक्सीतून आला अन् समुद्रात कचरा फेकून गेला; मग BMCनं ओळख पटवून १० हजारांचा दंड ठोठावला

BMC : गेट वे ऑफ इंडियाच्या जवळील समुद्रात कचरा टाकल्याप्रकरणी बीएमसीने एका व्यक्तीला दंड ठोठवला आहे. कचरा टाकत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Bharat Jadhav

Mumbai Bmc Fine On Man Who Throw Trash In Sea :

दुसऱ्याच्या अंगणात कचरा टाकणारे लोक आपण बहुतेकवेळा पाहिलं असतील. या लोकांमुळे आपला परिसर आणि शहर अस्वच्छ होत असतं. आपलं शहर अस्वच्छ करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्यानं शहरातील अनेक भागात कचरा झालेला दिसतो. कचरा टाकणाऱ्याला एका पठ्ठ्याने बीएमसीने थेट १० हजार रुपयांचा दंड ठोठवला.(Latest News)

गेट वे ऑफ इंडियाच्या परिसराजवळील समुद्रात एक व्यक्तीने कचरा टाकला. या व्यक्तीला मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिकेनं शोधून काढलं. त्याला थेट १० हजार रुपायांचा दंड ठोठवला. समुद्रात कचरा फेकत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर अनेकांनी त्या घटनेवरून टीका केली जात होते. या व्हिडिओचा दाखला घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी कचरा टाकणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कचरा घेऊन आलेल्या टॅक्सीचा नंबर काढून या व्यक्तीची ओळख पटवली. त्यानंतर या व्यक्तिला ए विभागातील घनकचरा व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी १० हजार रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिलीय. गेट वे ऑफ इंडिया हे मुंबईतील पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी जगभरातून लोक येतात आणि पर्यटनाचा आनंद लुटतात. तेथेच या व्यक्तीने कचरा टाकला. सदर व्यक्ती टॅक्सीतून गेट वे ऑफ इंडियाजवळ आला.

त्याने त्याच्यासोबत आणलेला कचरा समुद्रात फेकून दिला. त्यानंतर तो निघून घेला. मात्र कुणीतरी त्याचा एक फोटो काढला. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर बीएमसीने कारवाई करत त्याला दंड ठोठवला. व्हायरल झालेल्या व्हिडिओ ५८ सेकंदांचा आहे. यात काही लोक टॅक्सीमधून येतात आणि समुद्रात कचरा टाकून निघून जातात. या लोकांच्या कृतीवर आनंद मंहिद्रा यांनी नाराजी व्यक्त केली. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ एक्स या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना मुंबई पोलीस आणि बीएमसीला टॅग केलं.

व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी एक नोट लिहिलीय. हे पाहून दु:ख होतं. पायाभूत सुविधा कितीही चांगल्या असल्या तरी. पण जोपर्यंत आपण आपल्या सवयी सुधारत नाही तोपर्यंत सकारात्मक बदल होणार नाही. त्यानंतर बीएमसी सतर्क होत त्यांनी या व्यक्तीवर कारवाई केली.

प्रदूषणाच्या विळख्यातून मुंबईची सुटका करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केलीय. कचरा करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी महापालिकेने कचरा टाकणाऱ्यांचा फोटो पाठवण्याचे आवाहन केले होते. कचरा टाकणाऱ्यांचा फोटो काढून ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईन ८१६९६-८१६९७’वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून केले आहे. उघड्यावर कचरा जाळणे, हा पर्यावरणविषयक कायदे आणि भारतीय दंड विधानानुसार गुन्हा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT