Raj Thackeray Latest Update SAAM TV
मुंबई/पुणे

राज ठाकरेंनी माफी मागितली नाही तर...; भाजपच्या मुंबईतील पदाधिकाऱ्याचा इशारा

उत्तर प्रदेशातील भाजप खासदारानं यापूर्वी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) अयोध्या दौऱ्यावर जाणार असून, त्यापूर्वीच विरोधाची धार अधिक तीव्र झाली आहे. उत्तर प्रदेशातील भाजप खासदारानं या दौऱ्याला विरोध करून आव्हान दिलं असतानाच, आता मुंबई भाजप प्रवक्त्यांनीही विरोध दर्शवून 'चॅलेंज' दिलं आहे. मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मारहाण केली होती. त्यामुळे राज ठाकरे यांनी आधी माफी मागावी आणि त्यानंतरच अयोध्या दौरा करावा, असे भाजप प्रवक्ता संजय ठाकूर यांनी म्हटलं आहे.

भाजपचे (BJP) उत्तर प्रदेशातील खासदार बृजभूषण सिंह यांनीही यापूर्वी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध दर्शवला होता. त्यानंतर आता भाजपचे मुंबईतील प्रवक्ता संजय ठाकूर यांनीही अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मारहाण केली होती. त्यामुळे राज ठाकरे यांनी आधी माफी मागावी आणि त्यानंतरच राज यांनी अयोध्या दौरा करावा, असे ठाकूर म्हणाले.

राज ठाकरे यांनी माफी मागितली तर मी लखनऊ विमानतळावर येऊन शेकडो वाहनांच्या ताफ्यासह त्यांना सुरक्षित आयोध्येत घेऊन जाईल, असेही ठाकूर म्हणाले. पण राज ठाकरे यांनी माफी मागितली नाही तर, विरोध करणारच, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.

उत्तर प्रदेशच्या भूमीत पायही ठेवू देणार नाही- बृजभूषण शरण सिंह

मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून वाद वाढतच आहे. राज ठाकरेंना 'उंदीर' म्हणणारे भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी पुन्हा राग आळवला आहे. प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम घेऊन राज ठाकरेंच्या विरोधाचे नियोजन करत आहोत. राज ठाकरे अयोध्याच नाही, तर उत्तर प्रदेशच्या धर्तीवर पाय ठेवू शकत नाहीत, असा इशाराही सिंह यांनी दिला.

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Natak:'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय'; चंद्रकांत कुलकर्णी लिखित नाटक लवकरच झळकणार मराठी रंगभूमीवर

Maharashtra Live News Update : आमदार डॉक्टर विजयकुमार गावित नंदुरबारमधील तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल

आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी पत्नीला पोटगी मिळणार नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळचं काऊंटडाऊन सुरु; शिक्षक भावाच्या आर्थिक नाड्या आवळल्या

Pune News: निलेश गायवळचा जामीन अर्ज रद्द करा, पुणे पोलिसांचा उच्च न्यायालयात अर्ज|VIDEO

SCROLL FOR NEXT