Mumbai Bribe News  AI Image
मुंबई/पुणे

Bribe Case : DGCA च्या २ बड्या अधिकाऱ्यांना २५०००० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं, मुंबईत CBI ची मोठी कारवाई

Mumbai Bribe Case News : विमानांच्या एअरवर्दिनेस प्रमाणपत्रासाठी 2.5 लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून CBIने DGCAचे उपसंचालक सुशील कुमार गर्ग आणि एस.के. भाने यांना अटक केली.

Alisha Khedekar

  • DGCAचे उपसंचालक सुशील कुमार गर्ग आणि एस.के. भाने यांना CBIने अटक केली

  • विमानांच्या एअरवर्दिनेस प्रमाणपत्रासाठी 2.5 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप

  • मुंबई, सालेम आणि चेन्नई येथे तपासाचा भाग म्हणून झडती घेण्यात येणार

भारताच्या हवाई सुरक्षेची जबाबदारी असलेल्या DGCA तील अधिकाऱ्याविरोधात CBI ने मोठी कारवाई केली आहे. विमानांच्या ‘एअरवर्दिनेस’ प्रमाणपत्रासाठी 2.5 लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून CBI ने DGCA चे उपसंचालक सुशील कुमार गर्ग आणि एक्वी एअर ट्रेनिंग ऑर्गनायझेशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक एस.के. भाने यांना अटक केली आहे. या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून मुंबई, सालेम आणि चेन्नई येथे झडती घेण्यात येणार आहे.

CBI ने 3 ऑक्टोबर रोजी या प्रकरणात FIR दाखल केली. त्यानुसार, गर्ग हे एक्वी एअर ट्रेनिंग ऑर्गनायझेशनकडून विमानांच्या एअरवर्दिनेस प्रमाणपत्रांसाठी कथितरीत्या बेकायदेशीर पैशांची मागणी करत होते. विमानांमध्ये असलेल्या सुरक्षाविषयक त्रुटी आणि नियमांचे पूर्ण पालन झाले नसतानाही अनुकूल अहवाल देण्यासाठी लाच मागण्यात आल्याचा आरोप आहे.

कल्याण येथील एक्वी एअर ट्रेनिंग ऑर्गनायझेशन या कंपनीकडे प्रशिक्षणासाठी सात विमाने असून, त्यांचा प्रशिक्षण तळ सालेम विमानतळावर आहे. CBI च्या माहितीनुसार, गर्ग यांनी 31 जुलै रोजी कंपनीच्या विमानांचे एअरवर्दिनेस ऑडिट केले होते. या ऑडिटदरम्यान आढळलेल्या काही त्रुटींकडे दुर्लक्ष करून अनुकूल अहवाल देण्याच्या बदल्यात लाच मागितल्याचा आरोप FIR मध्ये करण्यात आला आहे.

2 ऑक्टोबर रोजी गर्ग आणि भाने यांच्यात कथित लाचेबाबत चर्चा झाली. प्रत्येक ऑडिट व्यवहारासाठी 50 हजार रुपये देण्याचे ठरल्याचा दावा CBI ने केला आहे. त्यानंतर गर्ग यांनी कथितरित्या 2.5 लाख रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर CBI ने दोघांनाही अटक केली. या प्रकरणात पुढील तपासासाठी संबंधित ठिकाणी झडती घेण्यात येणार असल्याची माहिती CBI अधिकाऱ्याने दिली आहे. विशेष म्हणजे, याच वर्षात DGCA अधिकाऱ्यांविरोधात CBI कडून तपास सुरू असलेले हे तिसरे प्रकरण असल्याचे समोर आले आहे.दरम्यान आता या दोन अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : नवरात्रीत फिटनेसचा फंडा, वजन कमी करण्यासाठी रोज किती वेळ गरबा खेळावा?

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामाच्या मागणीसाठी अमरावतीत इंडिया आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांच्या जीवाला धोका, दिल्लीतील निवासस्थानाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

Nana Patekar Death : 'मी आज आहे, उद्या असेन की नाही...' नानांचे ते शेवटचे शब्द खरे ठरले |VIDEO

Maharashtra Politics: मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT