मुंबईवर स्वातंत्र्यदिनापूर्वी हल्ला करण्याची धमकी देणारा मेल महापौरांना पाठवण्यात आला आहे. AI  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Attack threat : मुंबईवर १५ ऑगस्टआधी दहशतवादी हल्ल्याचा धोका; महापौरांना धमकीचा मेल, ही ठिकाणं निशाण्यावर

mumbai attack threat before august 15 : स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईवर हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडेंना हा धमकीचा मेल पाठवण्यात आला आहे. पोलीस सतर्क झाले असून धमकीचा मेल करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे.

Nandkumar Joshi

देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. १५ ऑगस्टपूर्वी मुंबईतील विविध ठिकाणी हल्ला करण्याच्या धमकीचा मेल महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत इमेलवर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मेलमध्ये खालिस्तान समर्थनार्थ घोषणांचाही उल्लेख असल्याचे कळते. मुंबई पोलिसांकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आठवडाभरावर स्वातंत्र्यदिन साजरा होत असतानाच हा धमकीचा मेल आला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत ई-मेलवर हा धमकीचा मेल आला आहे. यात महापौर कार्यालय, मुंबई मेट्रो, शाळा आणि शेअर बाजार इमारतीत (स्टॉक मार्केट) स्फोट घडवून आणले जातील, अशी धमकी देण्यात आली आहे. या मेलमध्ये अनेक खालिस्तान समर्थकांची नावेही आहेत. हा मेल कोणी पाठवला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

१५ ऑगस्टपूर्वी हल्ल्याचा धोका?

स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईत हे हल्ले घडवून आणू, असा उल्लेख या मेलमध्ये केला आहे. या पार्श्वभूमीवर ज्यांची मुले शाळेत जातात आणि मेट्रोने प्रवास करतात, अशा पालकांना सतर्क करण्यात आले आहे. तथापि, मुंबईच्या महापौरांना अशी धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशी धमकी देण्यात आलेली आहे.

यापूर्वीही आला होता धमकीचा मेल

१० जून रोजी पाठवलेल्या एका मेलमध्ये मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE), मुख्यमंत्री कार्यालय आणि मुंबई महापालिकेची (BMC) इमारत, महापौर रितू तावडे यांचे कार्यालय आणि इतर ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. मात्र, तपासात हा मेल बोगस असल्याचे स्पष्ट झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेसेनेचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला; मराठीची सक्ती, भाजपला यूपी निवडणुकीची भिती?

Maharashtra News Live Update: दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट, कोर्टाचे तपास अधिकाऱ्यांना ताशेरे

Lek Ladki Yojana 2026: लेक लाडकी योजनेतून मुलींना मिळणार १ लाख १ हजार रुपये; जाणून घ्या पात्रता आणि कागदपत्रे

मराठी भाषेच्या कार्यक्रमात भोजपुरी धिंगाणा, मराठी सक्ती करणाऱ्यांनाच अस्मितेचा विसर

Raksha Bandhan Wishes: रक्षाबंधनाची करा गोड सुरुवात; भावंडांना पाठवा ७ प्रेमळ शुभेच्छा संदेश

SCROLL FOR NEXT