Mumbai Police uncover a massive synthetic drug factory operating from a rented room in Andheri, linked to a parole absconder. saam tv
मुंबई/पुणे

राहतो भाड्याच्या घरात, महिन्याला ३० कोटी कमावतो; गुजरातच्या जेलमधून पॅरोलवर सुटला, मुंबईत उघडली ड्रग्जची फॅक्टरी

Synthetic Drug Factory In Mumbai Andheri Chawl: मुंबईतील अंधेरी परिसरात भाड्याच्या खोलीत सुरू असलेली कोट्यवधींची ड्रग्ज फॅक्टरी उघडकीस. गुजरातमधून फरार आरोपीकडून महिन्याला २५ ते ३० कोटींचा काळा धंदा. मुंबई पोलिसांची मोठी कारवाई.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई पोलिसांनी एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला असून अंधेरीतील एका चाळीतून दरमहा 25 ते 30 कोटींच्या सिंथेटिक ड्रग्जची निर्मिती आणि पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे गुजरात पोलिसांच्या ताब्यातून फरार झालेला एक कुख्यात तस्कर या संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाइंड असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

साध्या खोलीत ड्रग्ज फॅक्टरी

आरोपी मोहम्मद आरीफ मोहम्मद इलीयास शेख (44) याने पोलिसांच्या नजरेतून सुटका करण्यासाठी एक अनोखी युक्ती लढवली होती. तो स्वतः सांताक्रुझमधील गोळीबार नगर येथे पत्नीसोबत राहत होता. मात्र ड्रग्ज बनवण्यासाठी त्याने अंधेरीतील सहारा रोडवरील भास्कर चाळ येथे 13 हजार रुपये महिना भाड्याने एक वेगळी खोली घेतली होती. या छोट्याशा खोलीत त्याने साध्या सेटअपद्वारे एमडी ड्रग्ज तयार करण्याची मिनी फॅक्टरीच सुरू केली होती.

असा झाला खुलासा

खार पोलिसांनी गस्तीदरम्यान मोहम्मद आरिफला संशयास्पद स्थितीत ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे 15.44 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि मोबाईल सापडला. त्याची सखोल चौकशी केली असता अंधेरीतील त्या भाड्याच्या खोलीचे रहस्य समोर आले. पोलिसांनी तिथे छापा टाकला असता ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारी रसायने आणि मोठी उपकरणे जप्त करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरिफला गुजरातमध्ये ड्रग्ज प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा झाली होती. 2023 मध्ये तो परोलवर बाहेर आला आणि तेव्हापासून फरार होता. या फॅक्टरीतून दरमहा 25 ते 30 कोटींचे ड्रग्ज तयार करून नेटवर्कमार्फत पुरवले जात होते. आरोपीची पत्नी नसरीन ही या काळ्या धंद्यातील पैशांचा हिशोब ठेवत असे. पोलिसांनी तिच्या बँक खात्यातील २६ लाख रुपये गोठवले आहेत. आरिफचा साथीदार रिजवान अहमद लियाकत अली याला उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथून अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बीडच्या पारगाव शिरस गावात भव्य बैलगाडा शर्यतीचा थरार

Nagpur : डेटिंग अ‍ॅपवर तरुणाशी ओळख, बारमध्ये भेटायला बोलावलं; तरुणीने नंतर जे काही केलं ते चक्रावून टाकणारं...

राज्याला मिळाले नवे मुख्यमंत्री, उद्या होणार शपथविधी

Madhavi Nimkar Photos: 'जणू आकाशातून अप्सराच अवतरली!' माधवीचं मराठमोळं सौंदर्य पाहून हेच म्हणाल

Weather Update : अकोल्यात सूर्य ओकतोय आग, जगातील उष्ण शहरांच्या यादीत दुसरं नाव; आजचं तापमान किती?

SCROLL FOR NEXT