Unsafe Milk Destroyed In Mumbai Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai: मुंबईकरांनो सावधान! तुम्ही पिताय ते दूध निकृष्ट दर्जाचे? तब्बल ११ हजार लिटर दूध जप्त

Unsafe Milk Destroyed In Mumbai: मुंबईमध्ये एफडीएने मोठी कारवाई करत निकृष्ट दर्जाच्या दुधाचा साठा जप्त करत केला. तब्बल ११ हजार लिटर दूध जप्त करण्यात आले. तर ९० लिटर असुरक्षित दूध तात्काळ नष्ट केले.

Priya More

Summary -

  • मुंबईत एफडीएची मोठी कारवाई

  • ११ हजार लिटरपेक्षा जास्त दूध जप्त

  • ६ नमुने निकृष्ट आणि १ नमुना धोकादायक

  • असुरक्षित दूध तात्काळ नष्ट करण्यात आले

संजय गडदे, मुंबई

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबईमध्ये एफडीएने मोठी कारवाई केली. ११ हजार लिटरहून अधिक दूध जप्त करण्यात आले. मुलुंड, ऐरोली, मानखुर्द, दहिसर आणि शिवडी येथे एफडीएने कारवाई केली. एकूण १९५ दुधाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्या आले आहेत. १८८ नमुने सुरक्षित असून ६ निकृष्ट तर १ नमुना धोकादायक आढळून आला. त्यानंतर एफडीएने ९० लिटर असुरक्षित दूध तात्काळ नष्ट केले. एफडीएकडून मुंबईत येणाऱ्या दूध वाहतूक वाहनांची टोलनाक्यांवरच तपासणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार दूध मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनने मुंबई आणि उपनगरांमध्ये विशेष तपास मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान मुंबईत येणाऱ्या दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांची प्रमुख टोलनाक्यांवर तपासणी करण्यात आली. ही मोहीम रात्रीच्या वेळेत राबवण्यात आली. मुलुंड (आनंद नगर), मुलुंड (LBS रोड), ऐरोली, मानखुर्द, दहिसर आणि शिवडी या सहा प्रवेश ठिकाणी FDA च्या पथकांनी तपासणी केली.

तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांनी एकूण १९५ दुधाचे नमुने घेतले. त्यापैकी १८८ नमुने सुरक्षित आढळले, ६ नमुने निकृष्ट दर्जाचे होते तर १ नमुना आरोग्यास अपायकारक असल्याचे आढळले. तसेच पुढील कारवाईसाठी आणखी ७ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. या कारवाईत एकूण ११,०८०.५ लिटर दूध जप्त करण्यात आले. निकृष्ट दर्जाचे दूध सील करून उत्पादकांकडे परत पाठवण्यात आले. तर सुमारे ९० लिटर असुरक्षित दूध तात्काळ नष्ट करण्यात आले.

FDA ने सांगितले की, नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारच्या मोहिमा पुढेही सुरू राहतील. अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर दुबे पाटील यांनी नागरिकांना संशयास्पद किंवा असुरक्षित अन्नपदार्थ आढळल्यास FDA ला माहिती देण्याचे आवाहन केले आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! दुसऱ्याशी लग्न ठरल्याचा राग, तरुणाने घरात घुसून गर्लफ्रेंडवर चाकूने केले सपासप वार

LPG Rule: मोठी बातमी! १ मेपासून एलपीजी सिलिंडरच्या नियमात मोठे बदल, सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

पावसाच्या प्रत्येक थेंबाची अचूक नोंद होणार, पुण्यातील दाम्पत्यानं बनवलं 'पर्जन्यमापक यंत्र'

मानखुर्दमध्ये क्रेन कोसळली, मुंबईची वाहतूक 22 तास ठप्प

कामगारांच्या नोकरीवर टांगती तलवार? कामगारांवर आता कायद्यानं कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT