Mumbai Pollution Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai Air Pollution : मुंबईची हवा पुन्हा बिघडली, 24 तासांत PM2.5 पातळी 50% पेक्षा वाढली,नक्की काय आहे कारण?

Sandeep Gawade

मुंबई शहराची बुधवारी धुके आणि कमी हवेच्या गुणवत्तेसह दिवसाची सुरुवात झाली. हा बदल अचानक झाला नसला तरी, गेल्या काही वर्षांपासून हिवाळ्याच्या सुरुवातीला वातावरणात होणारी घसरण नोंदवली जात आहे. वाहन, उद्योग, आणि बांधकाम प्रकल्पांमधून होणारे उत्सर्जन हवेच्या प्रवाहात अडकल्याने वायू प्रदूषणात वाढ होते. या परिस्थितीमध्ये ओलसर हवामानामुळे सूक्ष्म कण हवेत स्थिर राहतात, ज्यामुळे हवा गरम आणि दमट बनते.

कुलाबा, सांताक्रूझ भागात सर्वाधिक प्रदूषण

Respirer Living Sciences चे तज्ज्ञ रोणक सुतारिया यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मुंबई शहराची PM 2.5 पातळी ५०% पेक्षा जास्त वाढली आहे, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. विशेषत: कुलाबा भागात ८१ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. हवेतील PM2.5 आणि PM10 या कणांचे प्रमाण वाढल्यास, ते श्वासावाटे शरीरात जाऊन आरोग्य बिघडवू शकतात. परिणामी श्वसनाचे आजार, हृदयविकार आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो.

बुधवारी कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळांमध्ये नोंदवलेल्या तापमानानुसार, दिवसाचं तापमान कमला तापमान अनुक्रमे ३२.५°C आणि ३३.५°C होते, तर सकाळी किमान तापमान २७.४°C होते. हवेतील आर्द्रता आणि वाढलेली तापमानाची पातळी हे वायू प्रदूषणाची तीव्रता वाढवणारे घटक आहेत.

हवेच्या गुणवत्तेत अचानक झालेल्या या घसरणीमुळे पर्यावरण कार्यकर्त्या सुमैरा अब्दुलाली यांना नाराजी व्यक्त केली. मुंबई महानगरपालिका (BMC) प्रगत सल्लागार प्रणाली तयार करण्यात मागे का आहे? त्यांनी अशी प्रणाली सुरू करण्याचे वचन दिले होते.अशी प्रणाली माणसांना हवेच्या गुणवत्तेबद्दल अचूकपणे सतर्क करू शकेल, ज्यामुळे मुंबईकरांना योग्य निर्णय घेण्यास मदत होईल,जसं की घरात राहणे किंवा मेहनतीचे काम टाळणे.

महामारीनंतर, मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेत सलग हिवाळ्यात मोठी घसरण दिसून आली आहे. गेल्या वर्षी, हवेच्या गुणवत्तेतील झपाट्याने घट झाल्यामुळे पंतप्रधान कार्यालयाने हस्तक्षेप केला आणि राज्य सरकारला प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. अखेरीस, BMC ने धूळ प्रदूषण आणि उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना जाहीर केल्या

यामध्ये विकासकांना बांधकाम प्रकल्पांच्या बाहेर २५ फूट उंचीच्या टिन,लोखंडी पत्र्यांचे कुंपण लावणे, बांधकाम किंवा तोडणी चालू असलेल्या इमारतींना सर्व बाजूंनी कापड,जूट, किंवा ताडपत्रीने झाकणे आणि काम संपल्यानंतर हटवताना आधी पाणी शिंपडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

बांधकाम स्थळांवर सेन्सरवर आधारित वायू प्रदूषण मॉनिटर बसवण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरून पातळी मर्यादेपेक्षा जास्त गेल्यास तत्काळ कारवाई करता येईल. पिसणे, कापणे, ड्रिलिंग, आरा करणे, आणि ट्रिमिंग कामे बंदिस्त भागात करण्याचे आदेश देण्यात आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड आकारण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून याच काळात हवेच्या गुणवत्तेत घसरण होताना दिसत आहे. पावसाळा संपल्यानंतर वाऱ्याच्या गतीत होणारे बदल आणि मंद वाऱ्याचा वेग प्रदूषण सापळ्यात ठेवतो. वायू प्रदूषण ही एक आंतरसिमावर्ती समस्या आहे आणि यासाठी फक्त मुंबई महानगर क्षेत्रच नाही तर आसपासच्या भागांमध्ये देखील क्षेत्रीय हस्तक्षेपांची गरज आहे, जिथे प्रदूषणास कारणीभूत असलेल्या अनेक स्रोतांचा समावेश आहे, असं वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (WRI) इंडियाचे प्रोग्राम डायरेक्टर कुमार यांनी टाईम्स ऑफ इंडियाला माहिती देताना सांगितलं. पावसाळा संपल्यावर हवामान बदलत असताना, हिवाळ्यातील स्थितीवर ला नीना परिणाम होईल का यावर सध्या संशोधन सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Classical Language Status : अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय? निर्णयाने काय होणार फायदा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Marathi News Live Updates : महायुतीत एकनाथ शिंदे १०० जागा लढवण्यावर ठाम?

Railway Employees Bonus 2024: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, केंद्राने बोनस केला जाहीर; मिळणार 'इतकी' रक्कम

Marathi Classical Language Status : जाहलो खरेच धन्य...! मराठी भाषेला अभिजात दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: शरद पवारांचा एकाच वेळी भाजप-अजित पवारांना धक्का, डाव टाकताच बडे नेते लागले गळाला!

SCROLL FOR NEXT