Mumbai Air Pollution  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Air Pollution : मुंबईत कोंडतोय 'श्वास', वाढत्या प्रदूषणामुळं बिघडली हवेची गुणवत्ता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई, Shodhan

Mumbai AQI : संपूर्ण मुंबईत हवेची देखील गुणवत्ता खालावत चालल्याचं पाहायला मिळत आहे. संपूर्ण मुंबईचा हवा गुणवत्ता सरासरी निर्देशांक पावणे दोनशेच्या घरात आहे. कुलाबा, सिद्धार्थ नगर आणि वरळी येथे सर्वाधिक एक्यूआयची नोंद झाली आहे. तेथील हवेचा गुणवत्ता सरासरी निर्देशांक 183 आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील 25 ठिकाणांपैकी दोन ठिकाणी कमीत कमी एक्यूआयची नोंद झाली आहे. (latest mumbai pollution update)

भांडुप पश्चिममध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक 124 आणि जुहूमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक 167 आहे. तर उर्वरित 123 ठिकाणांचा हवा गुणवत्ता निर्देशांक 170 च्या पुढे आहे. कुलाबा, वरळी, सिद्धार्थ नगर पाठोपाठ कुर्ला आणि बीकेसी येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 182 आहे. (Air Pollution)

मालाड आणि माजगाव येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 181 आहे, तर विलेपार्ले पश्चिम येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 180 आहे. सायन, जुहू, वांद्रे पूर्व, बोरवली पूर्व, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, देवनार, नेव्ही नगर, कुलाबा, पवई या ठिकाणांनी हवेचा गुणवत्ता निर्देशांक 170 पार केला आहे. तर कुलाबा, सिद्धार्थ नगर, वरळी या ठिकाणांनी हवेचा गुणवत्ता निर्देशांक 180 पार केला आहे. दिल्ली पाठोपाठ आता मुंबई शहराची स्थिती चिंताजनक होत आहे. या प्रदुषणामुळे नागरिकांना विविध आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

हवा गुणवत्ता निर्देशांक

हवा गुणवत्ता निर्देशांक म्हणजे काय? ते कसे कार्य करते? हे आपण जाणून घेवू या. AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स ज्याला आपण मराठीमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक म्हणतो. हा एक नंबर आहे, यावरून हवेची गुणवत्ता तपासली जाते. त्यामुळे वायू प्रदूषणाचीही कल्पना येते.

AQI पातळीची विभागणी

AQI आता जगातील प्रत्येक देशात मोजलं जात आहे. मात्र, प्रत्येक ठिकाणी मोजण्याची पद्धत सर्वत्र वेगळी आहे. भारतात पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं AQI लाँच केलं आहे. देशातील AQI पातळी 06 श्रेणींमध्ये विभागली गेली आहे. AQI 0-50 च्या दरम्यान असणे म्हणजे हवा स्वच्छ आहे. AQI 51-100 च्या दरम्यान असणे म्हणजे हवेची शुद्धता समाधानकारक आहे. AQI 101-200 ते दरम्यान असणे म्हणजे हवेची गुणवत्ता ‘मध्यम’ आहे. AQI 201-300 दरम्यान असणे म्हणजे हवेची गुणवत्ता वाईट आहे. AQI 301-400 च्या दरम्यान म्हणजे हवेची गुणवत्ता जास्त वाईट आहे, आणि AQI 401-500 दरम्यान म्हणजे गंभीर श्रेणी समजली जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT