Mumbai Air Pollution Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Air Pollution : मुंबईकरांचा 'श्वास' गुदमरला, वायू प्रदूषणामुळे BMCकडून मास्क घालण्याचं आवाहन

Mumbai News : मान्सूनच्या एक्झिटनंतर हवेची गुणवत्ता घसरायला सुरुवात झाली आहे.

कोमल दामुद्रे

Mumbai News :

मान्सूनने घेतलील एक्झिट आणि ऑक्टोबर हिटचा मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अशातच मागील दोन ते तीन दिवसांपासून मुंबई आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात सकाळी धुकं पसरत असल्याचा अनुभव नागिराकांना आला आहे.

मात्र हे धुकं आहे की, प्रदूषण असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता खालवल्यामुळे याचा काही प्रमाणात त्रास नागरिकांना होताना दिसून येत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परंतु, सध्या दिल्लीपेक्षा (Delhi) मुंबईतील हवेपेक्षाही खराब झाली आहे. वाऱ्याचा वेग कमी झाल्यामुळे हवेत लहान कण पसरतात ज्यामुळे सकाळी हवेत धुके दिसून आले. मुंबईतील हवेचा दर्जा घसरल्यामुळे पालिकेने नागरिकांना मास्क लावण्याचे आवाहन केले आहे. तसेच ठाणे आणि नवी मुंबईतील हवा सर्वाधिक खराब असल्यामुळे संपूर्ण मुंबई (Mumbai) महानगरातील नागरिकांचा श्वास कोंडल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले आहे.  

अशातच विलेपार्ले, चकाला या ठिकाणी काल सायंकाळी हवेची पातळी अतिशय धोकादायक होती. आज १९ ऑक्टोबर रोजी IMD च्या ट्विटनुसार हवामानाची गुणवत्ता (Air Pollution) कालपेक्षा काही प्रमाणात चांगली आहे.

वरळीमध्ये आज एअर क्लालिटी इंडेक्स हा १२१ तर बोरीवलीमध्ये AQI हा १६६ वर आहे, कुलाबा आणि नवी मुंबईत AQI १५२ वर आहे. आज हवेतील गुणवत्ता ही मध्यम प्रमाणात असल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

SCROLL FOR NEXT