Accident
Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Accident News: बेदर'कार'! बेधुंद वाहनचालकाची 7-8 गाड्यांना धडक

Shivani Tichkule

अभिजित देशमुख

Mumbai Accident News Today: डोंबिवली पश्चिम परिसरात मद्यधुंद वाहनचालकाने भरधाव वेगाने गाडी चालवत सात ते आठ गाड्यांना धडक दिल्याची घटना घडली. या मध्ये दुचाकी, रिक्षा आणि चार चाकी गाड्यांचा समावेश होता. सुदैवाने रिक्षातील प्रवासी व दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले. मात्र त्यांच्या गाड्यांचे नुकसान झाले. (Latest Marathi News)

या मध्यधुंद वाहनचालकाचा बेदरकारपणे गाडी चालवत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालाय. नागरिकांनी पाठलाग करत या वाहनचालकाला चांगलाच चोप देत विष्णू नगर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी (Police) या मद्यधुंद वाहनचालकाला ताब्यात पुढील तपास सुरू केला आहे .

ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात; सात जखमी

मुंबई गोवा महामार्गावर पेण येथे पुलावर सिमेंट मिक्सर ट्रक आणि कारमध्ये भिषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये कारमधील सात प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. (Accident News)

खेडवरून मुंबईच्या दिशेने जात असताना सिमेंट मिक्सर ट्रकने कारला जोरदार टक्कर दिल्याने हा अपघात झाला. प्रणाली सावंत वय वर्ष 45, वैशाली शिगवण वय वर्ष 35, वनिता शिगवण वय वर्ष 60, आरोही शिगवण वय वर्ष 10 सर्व राहणार सांताक्रूझ, ऋषभ अधिकारी वय वर्ष 10 रा. नालासोपारा, नम्रता कांबळे वय वर्ष 29 रा. पनवेल आणि दीपक उतेकर कार चालक वय वर्ष 33 रा. खेड अशी जखमींची नाव आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरोग्यमंत्री Tanaji Sawant यांचा ओमराजे निंबाळकरांवर गंभीर आरोप!

Salman Khan House firing Case : आरोपीच्या मृत्यूबाबत आईला वेगळाच संशय; हायकोर्टात याचिका

Maharashtra Politics 2024 : दानवेंची भेट नाकारल्याने मराठा आंदोलक भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट; पळशीतील तणावाचा Video समोर

Amazon Sale: स्वस्तच नाही, तर मस्तच! iPhone 14 च्या किंमतीत आणखी झाली घट, खरेदी करण्याची सुवर्णसंधी

Ajit Pawar On Rahul Gandhi | गांधी घराण्यावर बोलताना अजितदादा चुकले! पुढे काय घडलं?

SCROLL FOR NEXT