Mumbai Accident Saam TV Marathi
मुंबई/पुणे

Mumbai Accident : बीएमसीच्या गाडीची मायलेकराला धडक; यारी रोड परिसरात खळबळ

Mumbai accident news : मुंबईतील यारी रोड परिसरात बीएमसीच्या गाडीने महिला आणि तिच्या मुलाला धडक दिल्याची घटना घडली. चालक मद्यधुंद असल्याचा आरोप होत असून वर्सोवा पोलिसांनी त्याला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Mumbai Versova latest updates : वर्सोवा परिसरातील यारी रोड येथे बीएमसीच्या (मुंबई महानगरपालिका) एका वाहनाने महिला आणि तिच्या लहान मुलाला धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. ही घटना यारी रोडवरील म्युनिसिपल हॉस्पिटलजवळ घडली. अपघात घडवला तो वाहनचालक कथितरीत्या मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र संताप व्यक्त केला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बीएमसीचे वाहन भरधाव वेगाने येत होते. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने महिला आणि तिच्या मुलाला धडक दिली. सुदैवाने या अपघातात दोन्ही मायलेकांची जीवितहानी टळली असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघातानंतर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. चालकाविरोधात घोषणाबाजी करत नागरिकांनी रोष व्यक्त केला. "वेळीच ब्रेक लागला नसता तर मोठी दुर्घटना घडली असती," अशी प्रतिक्रिया काही स्थानिकांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच वर्सोवा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधित चालकाला ताब्यात घेतले. पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू असून, चालक मद्यप्राशन करून वाहन चालवत होता का, हे स्पष्ट करण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर संताप व्यक्त करत दोषी चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि गर्दीच्या भागात निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्यांवर कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: दोन वर्षांपूर्वीच्या भांडणाचा रक्तरंजित सूड; झोपलेल्या इसमाचा चिरला गळा

Beed Crime: बीड हादरले! सासरच्यांकडून विवाहितेची हत्या, डोक्यावर धारदार शस्त्राने वार करत संपवलं; नंतर मृतदेह विहिरीत फेकला

PM मोदी-अभिजीत दीपकेंची भेट? संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ, CJP अध्यक्ष म्हणाले...

Pune : पुणे पोलीस भिकारी आणि बेघर व्यक्तींना तुरुंगात का टाकत आहे? १५ दिवसांत ४२ जणांना कारगृहात डांबलं

नाशिक विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट! तगड्या उमेदवाराने घेतली माघार, पडद्यामागे काय राजकारण घडलं?

SCROLL FOR NEXT