Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking : लिफ्टमध्ये ओढलं अन्... मुंबईत ९ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचं हैवानी कृत्य

Mumbai Crime News : मुंबईत निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने ९ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करून १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Alisha Khedekar

  • मुंबईत ९ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

  • आरोपी निवृत्त पोलिस अधिकारीला अटक

  • पीडितेच्या आईने तातडीने तक्रार दाखल केली

  • मुलींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा समोर

मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने ९ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसाने मुलीला इमारतीतल्या लिफ्टमध्ये खेचून अत्याचार केले. या माजी पोलीस अधिकाऱ्याविरोधात कस्तुरबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीस आणि पीडित मुलगी एकाच इमारतीत राहत असून पोलीस हा निवृत्त अधिकारी आहे. पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार, रविवारी संध्याकाळी ६.५१ वाजता मुलगी लिफ्टजवळ उभी होती. यादरम्यान आरोपीने तिला आत ओढले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितल्याने हा प्रकार उघडकीस आला .

पीडित मुलीच्या आईने क्षणाचाही विलंब न करता आरोपी पोलिसाविरोधात कस्तुरबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनंतर आरोपी पोलिसावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय न्यायालयाने आरोपी पोलिसाला १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सदर घटना मुंबईत घडली असून या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान मुलींच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे. देशाचा रक्षण करणारे पोलिसच भक्षक बनत असतील तर, सामान्य नागरिकांनी कोणाकडे न्याय मागायचा असा संतप्त सवाल पालकवरगातून निम्हण केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : भाजपचा शिंदेसेनेला पुन्हा धक्का, कल्याणमधील शिलेदार फोडला

Maharashtra Live News Update: भाजपचे माजी ओबीसी प्रदेशाध्यक्षांच्या घरावर दगडफेक

IND vs SA: आता तरी जिंकूदे! टॉस जिंकण्यासाठी केएल राहुलने वापरला खास टोटका, तरीही पदरी निराशाच; पाहा नाण्यासोबत कर्णधाराने काय केलं?

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यातच मोठा झटका, बड्या नेत्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

Bhendi Curry Recipe: हॉटेल स्टाईल भेंडी मसाला ग्रेव्ही कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT