mumbai news
mumbai news  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai : मुलुंडमध्ये इमारतीचा काही भाग कोसळला; दोघांचा मृत्यू

जयश्री मोरे

मुंबई : मुंबईतून मोठं वृत्त समोर आलं आहे. मुंबईच्या मुलुंड (Mulund) पूर्व भागात एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील छताचा काही भाग कोसळला आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. इमारतीच्या छताच्या भागात आणखी माणसं दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सदर घटना ठिकाणी अग्निशामक दल आणि पोलीस पोहोचले आहेत. (Mulund building collapse News)

मुलुंड पूर्वेतील नाणेपाडा भागातील मोती छाया इमारतीत ही घटना घडली आहे. सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील छताचा काही भाग कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. देवशंकर नाथालाल शुक्ला (वय 93 ) आणि अर्खीबेन देवशंकर शुक्ला (वय 87) या दोन वृद्धांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे . सदर ठिकाणी अग्निशामक दल आणि पोलीस पोहोचले आहेत. या इमारतीच्या भागात अजून कोणी दबले गेले आहे का, याची शोध मोहिम सुरू आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेकडून मोती छाया इमारत धोकादायक घोषित केली होती. त्यामुळे इमारतील मुंबई महापालिकेडून नोटीस देखील बजवण्यात आली होती. सदर इमारत ही वीस ते पंचवीस वर्षे जुनी आहे. या आधी म्हणजेच काही महिन्यापूर्वी कुर्ल्यातील नेहरुनगरमध्ये चार मजली इमारत कोसळली होती. त्या घटनेतही अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मुंबईतील धोकादायक इमारतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Shendge News | सुप्रिया सुळे आणि विशाल पाटील वंचित कसे? शेंडगेंचा संतप्त सवाल

Today's Marathi News Live : दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील संघर्ष वाढणार?

Weight Loss Drinks : उन्हाळ्यात सकाळी उठल्याबरोबर 'हे' पेय प्या; ७ दिवसांत पोटावरील चरबी कमी होईल

Ujjwal Nikam Meet Raj Thackeray : उज्ज्वल निकम यांच्यासाठी राज ठाकरे सभा घेणार? शिवतीर्थावर चर्चा सुरू

CSK vs PBKS: चेन्नईच्या पराभवाचं नेमकं कारण काय? ऋतुराज गायकवाडने केला खुलासा

SCROLL FOR NEXT