MPSC Student Protest 
मुंबई/पुणे

MPSC परीक्षा पुढे ढकला, PSI पदसंख्या वाढवा; पुणे आणि संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं

MPSC Student Protest : पुणे-संभाजीनगरमध्ये MPSC विद्यार्थ्यांचं अचानक आंदोलन! परीक्षा ४५ दिवस पुढे ढकलण्याची, PSI/STI पदवाढीची मागणी. EWS गोंधळामुळे विद्यार्थी संतप्त झाले.

Namdeo Kumbhar

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

MPSC Student Protest : पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आज एमपीसीएसच्या विद्यार्थ्यांकडून अचानक आंदोलन पुकारण्यात आले. राज्य सेवेच्या मुख्य परीक्षा ४५ दिवस पुढे ढकलण्यात यावी, या मागणीसाठी पुणे, संभाजीनगर आणि इतर शहारात विद्यार्थ्यांनी आदोंलन पुकारले आहे. आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. आंदोलकांचे शिष्टमंडळ यासंदर्भात मुंबईत आयोगाची भेट घेणार आहे, यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात आंदोलन, मागण्या काय?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या (राज्यसेवा) निकालातील गोंधळ, आणि प्रक्रियेमधील पारदर्शकतेच्या अभावामुळे नाराज झालेल्या विद्यार्थ्यांनी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. कटऑफपेक्षा अधिक गुण मिळवूनही गुणवत्तायादीत स्थान न मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. परिणामी, परीक्षा पुढे ढकलावी आणि पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांच्या जागांमध्ये वाढ करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

राज्यसेवा परीक्षा एक डिसेंबर २०२४ रोजी झाली. १२ मार्च रोजी निकाल जाहीर झाले. त्यात मराठा समाजासाठी ‘सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे (एसईबीसी) आरक्षण लागू असतानाही काही मराठा विद्यार्थ्यांना ‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक’ (ईडब्ल्यूएस) यादीत समाविष्ट करण्यात आले. यामुळे मूळ ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातील अनेक विद्यार्थी अपात्र ठरले. परिणामी त्यांना मुख्य परीक्षेसाठी बसण्याची संधी मिळाली नाही. सरकारने मागणी मान्य करावी यासाठी आजपासून हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालया समोर सुरू करण्यात आले ची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.

संभाजीनगरमध्येही विद्यार्थ्यांचे आंदोलन -

छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकामध्ये आज सकाळी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जवळपास दोन तास ठिय्या आंदोलन केले. एमपीएससी परीक्षेबाबतच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले. एमपीएससीने पुढे ढकललेल्या परीक्षा या नोटिफिकेशन काढल्यापासून 45 दिवसानंतर घेण्यात याव्यात. PSI,STI सह विविध भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संख्येत वाढ करण्यात यावी, अशी मागणी या आंदोलन विद्यार्थ्यांनी केली आहे. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दोन तास या आंदोलन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या सूचनेनुसार आपले आंदोलन मागे घेतले. सरकारने आणि एमपीएससीने तात्काळ मागण्या मान्य करावी अन्यथा पुन्हा आंदोलन करू असा इशारा आंदोलन विद्यार्थ्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

SCROLL FOR NEXT