Sanjay Raut : शिबिराला गालबोट लावण्यासाठी दर्ग्यावर कारवाई, राऊतांचा महायुतीवर गंभीर आरोप | VIDEO

Sanjay Raut Latest News Update : शिवसेना (ठाकरे गट) शिबिराआधीच नाशिकमध्ये वातावरण तापले आहे. येथील दर्गा कारवाई शिबिराच्या यशाला गालबोट लावण्यासाठी असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊतांनी केला आहे.

महायुतीची प्रवृत्ती हिटलर सारखी आहे. शिबिराला गालबोट लावण्यासाठी आज दर्ग्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर केला. शिवसेना ठाकरे गटाचा आज नाशिकमध्ये मेळावा होणार आहे. त्यासाठी दिग्गज नेत्यांनी नाशिकमध्ये हजेरी लावली आहे. पण या शिबिराला सुरूवात होण्याच्या आधीच नाशिकमधील वातावरण तापले. दर्ग्यावरची कारवाई शिबिरावरून लक्ष हटवण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. हातात सत्ता नसतानाही शिबिर यशस्वी करणार असेही राऊत म्हमाले.

"हातामध्ये सत्ता नसतानाही आम्ही शिबिर यशस्वी करणार," असं ठाम विधान करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी करत राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. नाशिकमध्ये अनधिकृत दर्गा हटवण्याची कारवाई आजच केली जाणं, हे शिबिरावरून जनतेचं लक्ष हटवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी केला.

"कमळाबाई हे नाव देखील बाळासाहेब ठाकरे यांनीच दिलं होतं," असंही त्यांनी म्हटले. शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना राऊत म्हणाले, “शिबिराला गालबोट लावण्यासाठी मुद्दाम अशा कारवाया केल्या जात आहेत, मात्र आमचं लक्ष विचलित होणार नाही.”

शिंदे-राज ठाकरे यांच्या कालच्या बैठकीवरही त्यांनी टोला लगावत प्रतिक्रिया दिली. "शिंदे आणि राज आमरस खाण्यासाठी भेटले होते," असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. युतीच्या संभाव्य प्रश्नावर मात्र उत्तर देणं त्यांनी टाळलं आणि “युती झाली, की बोलू,” असं म्हणत विषय बदलला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com