chhagan bhujbal
chhagan bhujbal  saam tv
मुंबई/पुणे

Chhagan Bhujbal : MPSCच्या घोळामुळे पत्रकारिता पदवीधरांचा जीव टांगणीला; छगन भुजबळ यांनी वेधले शासनाचे लक्ष

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने माहिती व जनसंपर्क विभागातील विविध पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. मात्र ऑनलाईन प्रक्रियेत तांत्रिक तृटी असल्याने पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांचे अर्ज स्विकारले जात नसल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे अनेक पत्रकारिता पदव्युत्तर पदवीधारकांचा जीव टांगणीला लागला आहे. याबाबत तातडीने तांत्रिक तृटी दूर करून पदव्युत्तर पदवी धारकांचे अर्ज स्वीकारण्यात येऊन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. पत्राद्वारे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी व माहिती अधिकारी या पदांसाठी जम्बो भरतीची जाहिरात प्रसिध्द केली आहे. या जाहिरातीसाठी पत्रकारिता व जनसंपर्क क्षेत्रातील उच्च शैक्षणिक अर्हता असतांनाही उमेदवारांचे ऑनलाईन अर्जासाठी अपात्र असल्याचे संदेश येत आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या हेल्पलाईनच्या माध्यमातून उमेदवारांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे राज्यातील लाखो पत्रकारिता पदव्युत्तर पदवीधारकांचा जीव टांगणीला लागला आहे. कधी नव्हे अनेक वर्षापासून उपलब्ध झालेली संधी एमपीएससीच्या (MPSC) चुकीच्या ऑनलाईन प्रक्रीयेमुळे गमाविण्याची भीती तरूणांमध्ये निर्माण झाली असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सामान्य प्रशासन विभागाच्या मागणीपत्रानुसार माहिती व जनसंपर्क विभागाकडील उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी व माहिती अधिकारी या वर्ग-१ व वर्ग-२ पदांची जाहिरात क्र.१२९, १३० व १३१ ही ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रसिध्द केली आहे. या सर्व पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत २३ जानेवारी २०२३ आहे. मागील दहा वर्षात भरल्या गेल्या नसतील त्यापेक्षा कित्येक पट जागांसाठी यावेळी सरळसेवा भरती निघाली आहे.

मात्र सदर भरती प्रक्रियेतील जाहिरातीत स्पष्टपणे पत्रकारितेतील पदवी नमूद केले असतांनाही उमेदवार जेव्हा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जातो तेव्हा त्याला ‘आपल्याकडे सदर पदांसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता नसल्यामुळे अर्ज करण्यास पात्र नाहीत’ असा संदेश येतो. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करता येत नाही.

पत्रकारितेची बॅचलर व डिप्लोमा ही डीग्री घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येत आहे. मात्र पत्रकारिता व जनसंपर्क विषयात ख्यातनाम विद्यापीठातून कला पारंगत पदवी (पदव्युत्तर पदवी) घेतलेले विद्यार्थी अपात्र ठरत असल्याचे छगन भुजबळ यांनी शासणाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, राज्यातील सर्व प्रमुख शासकीय आस्थापना, सर्व विद्यापीठे, महानगरपालिका, सिडको, महावितरण, महाराष्ट्रि राज्य रस्ते विकास महामंडळ, जिल्हा परिषद, वनविभाग, समाज कल्याण, शासकीय व निमशासकीय महामंडळे तसेच खुद्द माहिती व जनसंपर्क विभागातील संचालक, जिल्हा माहिती अधिकारी व माहिती अधिकारी हे पदे सरळसेवेने भरतांना पत्रकारितेतील पदव्युत्तर पदवीला प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे.

ख्यातनाम विद्यापीठातून नियमितपणे प्राप्त केलेल्या कला पारगंत (पदव्युत्तर पदवी) धारकांस जर या पदांसाठी अर्ज करता येत नसतील तर माहिती प्रशासनात तूलनेने कमी पात्रता व ज्ञान असलेल्या अधिकाऱ्यांचा शिरकाव होऊ शकतो. हे निश्चित राज्याच्या प्रगतीसाठी भूषणावह नाही असे त्यांनी म्हटले आहे.

आपल्या यापूर्वीच्या जाहिरात क्र.४२/२०१७, ५९/२०१७ व ०३/२०२१ पदांसाठी सुरूवातीस ऑनलाईन अर्ज भरतांना पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी धारकांना अडचणी आल्या होत्या. कालातरांने त्यात दुरूस्ती करण्यात येऊन अर्ज स्विकारले गेले होते. तेव्हा सध्याच्या जाहिरात क्र.१२९, १३० व १३१ च्या माध्यमातून ही पत्रकारितेच्या पदव्युत्तर पदवीधारकांना ऑनलाईन अर्ज करतांना मुदत संपण्याच्या आत तात्काळ दिलासा देण्यात यावा. तसेच या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ही वाढविण्यात यावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ankita Lokhande Trolled : ‘स्वत:ला माधुरी दीक्षित नको समजू...’, धकधक गर्लच्या लूकमध्ये आली अंकिता लोखंडे, नेटकऱ्यांनी सुनावलं

Astro Tips: घरात सुखशांती नांदवण्यासाठी हळदीचा करा 'या' पद्धतीनं वापर

Sambhajinagar Corporation : प्रारूप विकास आराखड्यावर ८ हजार ५०० आक्षेप; सुनावणीसाठी चार अधिकाऱ्यांची समिती

Kolhapur Constituency : 'लोकांमध्ये मिसळणे आमच्यासाठी नवीन नाही', मतदानाचा हक्क बजावल्यानंतर शाहू महाराज छत्रपतींच्या नातीने स्पष्टच सांगितलं, Video

Career Tips: करिअरमध्ये यश हवंय? या टिप्स फॉलो करा

SCROLL FOR NEXT