MPSC Statement  Saam Tv
मुंबई/पुणे

MPSC Hall Ticket : घाबरू नका! डेटा अथवा पेपर लीक झालेला नाही, MPSCने ट्वीट करत स्पष्टपणे सांगितलं...

Latest News: डेटा आणि पेपर लीक प्रकरणाची दखल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतली आहे. यासंदर्भात आयोगाने ट्वीट केले आहे.

Priya More

Pune News: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) 30 एप्रिल रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेचे हॉल तिकीट (MPSC Hall Ticket) आणि पेपर लीक (MPSC Paper झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना (MPSC Student) मोठा धक्का बसला. तसंच या विद्यार्थ्यांमध्ये सध्या गोंधळाचे वातावरण आहे.

अशामध्ये डेटा आणि पेपर लीक प्रकरणाची दखल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतली आहे. अशाप्रकारे 'कोणाताही डेटा अथवा पेपर लीक झालेला नाही.', असे ट्वीट करत आयोगाने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गट 'ब' आणि गट 'क' संयुक्त पूर्व परीक्षा येत्या 30 एप्रिल रोजी होणार आहे. आयोगाकडून दोन दिवसांपूर्वीच या परीक्षांचे हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात आले. पण एका आठवड्यावर ही परीक्षा आली असताना रविवारी विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला. कारण या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट लीक झाले. तब्बल 90 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा डेटा लीक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्याचसोबत एमपीएससीचा पेपर देखील लीक झाला असल्याचा दावा केला जात आहे.

याच दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्वीट करत डेटा आणि पेपर लीक झाल्याच्या दाव्यांबाबतचा खुलासा केला आहे. या ट्वीटमध्ये आयोगाने प्रसिद्धीपत्रक शेअर केले आहे. या प्रसिद्धीपत्रकामध्ये आयोगाने असे म्हटले आहे की, 'महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 30 एप्रिल रोजी नियोजित विषयांकित परीक्षेचे प्रवेशप्रमाणपत्र 21 एप्रिल रोजी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावर तसेच बाह्यलिंकद्वारा उपलब्ध करुन देण्यात आली होती. यापैकी बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेली प्रवेशप्रमाणपत्रे एका टेलिग्राम चॅनेलवर प्रसिद्ध होत असल्याची बाब आज निदर्शनास आली.'

तसंच, 'सदर बाब निदर्शनास आल्यानंतर बाह्यलिंकद्वारे प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याची सुविधा बंद करण्यात आली. सदर चॅनेलवर प्रसिद्ध झालेली प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य डेटा लीक झालेला नाही. याची तज्ज्ञांकडून खात्री करण्यात आली आहे. तसंच सदर चॅनेलवर उमेदवारांचा वैयक्तिक डेटा उपलब्ध असल्याचा, तसेच त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा धादांत खोटा असून अशाप्रकारे कोणताही डेटा अथवा प्रश्नपत्रिका लीक झालेली नाही.', असा खुलासा एमपीएससीकडून करण्यात आला आहे.

महत्वाचे म्हणजे आयोगाने पुढे असे देखील सांगितले आहे की, 'आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे डाऊनलोड करुन घेतलेल्या प्रवेशप्रमाणपत्राच्या आधारेच उमेदवारांना परीक्षेला प्रवेश देण्यात येईल. त्याचसोबत प्रवेशप्रमाणपत्रे लीक करणाऱ्या चॅनेलच्या अॅडमिनविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. तसंच, पूर्वानियोजित वेळापत्रकानुसारच विषयांकित परीक्षेचे आयोजन करण्यात येईल.', असे देखील आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nutmeg Milk: रात्री झोप येत नसेल तर? दुधात मिसळा स्वयंपाकघरातील हा पदार्थ

Mumbai : ९ जुलैला भारत बंद! मुंबईत शाळा, बँका, बाजार… काय बंद राहणार? काय सुरु असणार?

Viral Video: चक्क पोलिसांकडून चोरी! जनरल डब्यातील झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल लंपास केला, VIDEO व्हायरल

Nagpur News : नागपूरच्या १२ वर्षीय जयेशचा मृत्यू नेमका कसा झाला? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

Dada bhuse : शालेय शिक्षण मंत्र्यांची 'दादा' गिरी; बंद पडलेल्या मराठी शाळेत कार्यालय थाटण्याचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT