MPSC Paper Leak Case: Saam Tv
मुंबई/पुणे

MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई, एमपीएससीच्या ३ अधिकाऱ्यांसह ६ जणांना अटक

MPSC Drug Inspector Paper Leak: एमपीएससीच्या औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात ६ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ३ एमपीएससीच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Priya More
  • एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई

  • पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी ६ जणांना केली अटक

  • एमपीएससीच्या ३ अधिकाऱ्यांसह ६ जणांना बेड्या

  • पेपरफुटीमुळे औषध निरीक्षक , गट-ब, अन्न व औषध प्रशासन विभागाची परीक्षा रद्द

एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या पेपरफुटी प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यामध्ये एमपीएससीच्या ३ अधिकाऱ्यांसह क्लास चालक आणि विद्यार्थ्याच्या नातेवाकांचा समावेश आहे. पेपरफुटी झाल्यामुळे एमपीएससीने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

औषध निरिक्षक पेपरफुटीप्रकरणात एमपीएससीच्या अप्पर सचिवालाही बेड्या ठोकण्यात आल्या. एमपीएसचे अप्पर सचिव अभिजीत लेंडवे यांना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. प्रेम प्रकरणातून औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटला. एमपीसीच्या २ सहायक कक्ष अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेवर नकाते यांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. परीक्षार्थी ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील आणि पेपरफुटीतला सूत्रधार प्रवीण पाटील या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पेपर फुटल्याचा आरोप करणारा गौरव पाटीलची भुमिकाही संशयास्पद आहे त्यामुळे त्याला अटक करण्यात आली नाही.

पेपरफुटी झाल्यानंतर एमपीएससीने औषध निरीक्षक , गट-ब, अन्न व औषध प्रशासन विभागाची परीक्षा रद्द केली. पेपरफुटीच्या गैरप्रकारामुळे एमपीएससीने हा निर्णय घेतला. या पेपरफुटीमागचा "आका" कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे कारण आता सरकारने परीक्षा रद्द केली असली तरी विद्यार्थ्यांसाठी अंशतः दिलासा आहे. या प्रकरणाचा खरा सूत्रधार जेव्हा सापडेल तेव्हा त्याच्याकडून सगळं सत्य समोर येईल त्यामुळे त्याबाबत सखोल चौकशी व्हावी अशी मागणी या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणातील गैरप्रकाराचे रोहित पवार आणि विद्यार्थी संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांकडे प्रकरणाची चौकशी सोपवण्यात आली होती. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत २० मार्च २०२६ ला काही विद्यार्थ्याना प्रश्नपत्रिका मिळाल्याचा आणि त्याचा लाभ झाल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. त्यामुळे आयोगाने हा निर्णय घेतला असून फेर परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प, लोकल रेल्वे स्थानकावर येताच अचानक धूर निघू लागला अन्...; पाहा VIDEO

Narali Purnima : नारळी पौर्णिमेला ५ मिनिटात काय बनवाल? खोबऱ्याची करंजी की खोबऱ्याची बर्फी

Famous Youtuber Death: प्रसिद्ध युट्यूबरचा २३व्या वर्षी दुर्दैवी अंत; महाकालच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला, आईचाही मृत्यू

Korean Vs Japanese Skincare : कोरियन की जपानी? ग्लोईंग स्किनसाठी कोणती स्किनकेअर बेस्ट?

SCROLL FOR NEXT