MPSC students  Saam TV
मुंबई/पुणे

MPSC परीक्षार्थींसाठी सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा;  ७ मोठे निर्णय

MPSC Students Protest : MPSC विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेत महत्त्वाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय जाहीर केले. सचिवांची बदली, ऑफलाइन परीक्षा, विक्रमी भरती आणि सिंगल कार्ड प्रणालीबाबत आश्वासनानंतर २ ऑक्टोबरचे आंदोलन स्थगित करण्यात आले.

Namdeo Kumbhar

MPSC students October 2 protest suspended latest news : एमपीएससी (MPSC) स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एमपीएससी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा केली. त्यांच्या सर्व प्रमुख मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय घेतले आहेत. सरकारच्या या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी २ ऑक्टोबर रोजी होणारे आपले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याची घोषणा केली आहे.

या बैठकीत एमपीएससीच्या सचिवांची तात्काळ बदली करणे, पुढील ३ वर्षांची विक्रमी पदभरती जाहीर करणे आणि विद्यार्थ्यांसाठी 'सिंगल कार्ड' प्रणाली सुरू करणे यांसारखे अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच आगामी गट 'क' (Group C) परीक्षेच्या जागांमध्ये विक्रमी वाढ करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्तृत चर्चा केली आणि त्यांच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला.

एमपीएससी अध्यक्ष हे संवैधानिक पद आहे. त्यांना हटवण्याचा अधिकार राज्य सरकार, मा. राज्यपाल यांना नाही. मा. राष्ट्रपतींना सुप्रीम कोर्टाच्या सल्ल्याने तो अधिकार आहे. एमपीएससीचे पूर्व आणि विद्यमान अध्यक्ष तसेच सदस्य यांच्याबाबत संविधानाच्या कलम 317 प्रमाणे हटवण्याची कारवाई व्हावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. त्यानुषंगाने 3 महिन्यात न्यायालयीन चौकशी करून त्या निष्कर्षाच्या आधारावर पुढची कारवाई करण्यात येईल.

एमपीएससी सचिवांची बदली तत्काळ करण्यात येईल.

एमपीएससी परीक्षा ऑफलाईनच होणार. सर्व विद्यार्थी घटकांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही वेगळा निर्णय होणार नाही.

आजवरचे सर्व रेकॉर्ड तुटतील, इतक्या जागा भरणार. राज्य सरकारमध्ये 30 ते 40 हजार पदोन्नती झालेल्या नव्हत्या. भरती नियमात 1960 पासून नवीन सुधारणा झालेल्या नव्हत्या. त्यामुळे विभागात साधारणतः 30-40% जागा भरण्याची परवानगी दिली जायची. आता 60% विभागांचे ते नियम तयार झाले आहेत, उर्वरित विभागांचे सुद्धा होत आहेत. त्यामुळे पूर्ण जागा भरण्याची तयारी सुरू आहे. 3 जानेवारीच्या गट ‘क’ च्या परीक्षेच्या अनुषंगाने जागावाढीची विद्यार्थ्यांची मागणी मान्य करण्यात आली. गट क मध्ये ही वाढ विक्रमी असेल.

सिंगल कार्डवर सर्व परीक्षा देता याव्या, अशी यंत्रणा उभारणार. माफक दरात हे कार्ड उपलब्ध करुन देण्यात येईल. शिवाय सर्व कागदपत्रे वारंवार द्यावी लागणार नाही, अशी व्यवस्था विकसित करणार

आता 3 वर्षांच्या जागा एकदम जाहीर करणार. सेवानिवृत्त होणार्‍या जागांवर एक वर्ष आधीच भरती प्रक्रियेला सुरुवात करणार. विक्रमी संख्येने जागा भरणार, 1 महिन्यात याचा संपूर्ण कार्यक्रम ठरवणार

यानंतर 2 ऑक्टोबरचे आंदोलन विद्यार्थ्यांनी तात्पुरते स्थगित करण्यात येत आहे, अशी घोषणा केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रोहित शर्मा-शुभमन गिलचे तांडव! दोन्ही सलामीवीरांनी ठोकले वादळी शतक; विंडीजची पळता भुई थोडी

Kidney Failure Risk: तरूणांमध्ये किडनी फेलचा धोका का वाढतोय? ही लक्षणे दिसताच घ्या खबरदारी

'कौन बनेगा करोड़पती'च्या शुटिंगवेळी मोठा अपघात; अमिताभ बच्चन पाय घसरून पडले, बिग बींना उभंही राहता येईना

Latest Mangalsutra Designs For Woman: महिलांसाठी मंगळसूत्राचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स, जे तुम्हालाही नक्की आवडतील

रोहित शर्माचा तोडफोड षटकार! '12 हजारी मनसबदार' हिटमॅनचा खतरनाक अंदाज, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT