राणेंना बाळासाहेबांनी नेते पदाची उपाधी दिली नाही यातूनच त्यांची लायकी दिसते - विनायक राऊत Saam Tv
मुंबई/पुणे

राणेंना बाळासाहेबांनी नेते पदाची उपाधी दिली नाही यातूनच त्यांची लायकी दिसते - विनायक राऊत

'कालच्या पत्रकार परिषदेतून बाण सुटले त्यामुळे काही जण घायाळ झालेत तर काही विव्हळत आहेत.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांंत सावंत -

मुंबई : काल संजय राऊतांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर आज नारायण राणेंनी राऊतांसह सेनेच्या अनेक नेत्यांवरती आरोप केले आहेत आणि राणेंच्या परिषदेनंतर आता पुन्हा शिवसेना नेते खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी देखील पत्रकार परिषदं घेतली यावेळी ते म्हणाले, 'कालच्या पत्रकार परिषदेतून बाण सुटले त्यामुळे काही जण घायाळ झालेत तर काही विव्हळत आहेत.

राणेंनी देखील आज पत्रकार परिषद घेतली संजय राऊत (Sanjay Raut) हे शिवसेनेचे नेते आहेत बाळासाहेबानी राणेंना नेते पदाची उपाधी कधी दिली नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी राणेंना (Narayan Rane) नेते पदाची जबाबदारी दिली नाही यातूनच त्यांची काय लायकी आहे ते दिसून येते असा घणाघाती टोलाही यावेळी राऊत यांनी राणेंना लगावला.

संजय राऊत यांनी सेना भवनात जाहीर पणे ईडी, सीबीआय बद्दल बोलण्याचे धाडस केले. राणेंवर जेव्हा ED लागली तेव्हा राणें आणि त्यांचा मुलगा गुपचूप चोर वाटेने दिल्लीत गेले आणि लोटांगण घातले अशी टीकाही त्यांनी केली. राणे यांनी स्वतः निर्माण केलेल्या पक्षाची देखील बेईमानी केली आहे. आज त्यांना जो अमित शहा, मोदी यांच्या प्रेमाचा कंट फुटला तो किती बेगडा आहे ते दिसते.

राणेवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची भांडाफोड करणार -

दरम्यान आदर्श मुख्यमंत्र्यांमध्ये ज्या पाच मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे, त्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा दोन वेळा समावेश झाला आणि हाच उदोउदो यांना बघवत नाही असही ते म्हणाले. किरीट सोमय्या यांनी राणेवर अनेक भ्रष्टाचाराचे केले त्याचा आम्ही भांडाफोड करणार असून किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राणेंनी 100 बोगस कंपन्या असल्याचा आरोप केला होता असही त्यांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

SCROLL FOR NEXT