Supriya Sule Saam tv
मुंबई/पुणे

Supriya Sule : पांडुरंगाची इच्छा! ठाकरेंनंतर पवार एकत्र येणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या...

Supriya Sule News : सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबीय एकत्र येण्यावर मोठं भाष्य केलं आहे. सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे .

Vishal Gangurde

सचिन जाधव, साम टीव्ही

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याविषयी चर्चा सुरु झाल्या आहेत. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेनंतर आता साऱ्यांचं लक्ष पवार कुटुंबीयांकडेही लागलं आहे. पवार कुटुंबीय एकत्र येण्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. पवार कुटुंबावर येण्याच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी पांडुरंगाची इच्छा असे उत्तर दिलं. सुप्रिया सुळे यांच्या उत्तरानंतर ठाकरे कुटुंबानंतर पवार कुटुंबाचीही चर्चा सुरु झाली आहे.

सुप्रिया सुळे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर भाष्य केलं. सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, 'राज ठाकरे म्हणाले की, आमच्या वादापेक्षा महाराष्ट्रातले वाद मोठे आहेत. ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. मी दोघांनाही संपर्क साधला. आता माझ्या माझ्या अंगावर काटा आला आहे. आमची आणि बाळासाहेब ठाकरे पाच-सहा दशकाचे कौटुंबीक संबंध आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आमच्या कुटुंबासाठी आजही प्रिय आहेत'.

'बाळासाहेब आज हा दिवस बघण्यासाठी असते तर आज आम्हाला खूप आनंद झाला असता. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघे एकत्र येत असतील तर राजकीय आणि कौटुंबिक, इतिहासाला सोनेरी दिवस आहे. दोन बंधू महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत असतील तर आपण मनाने त्यांचं स्वागत केलं पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

दोन्ही पवार एकत्र यावे, या प्रश्नावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'ती पांडुरंगाची इच्छा. माझ्यासाठी नातेसंबंध खूप महत्त्वाचे आहेत. आजही आणि उद्याही म्हत्वाचे असतील'.

संग्राम थोपटे यांच्या राजीनाम्यावर सुळे काय म्हणाल्या?

संग्राम थोपटे यांच्या काँग्रेस पक्षाच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या, 'देशात लोकशाही आहे. माझी आणि संग्राम थोपटे यांची भेट नाही. माझे आणि त्यांचे चांगले संबंध राहिले आहेत. ते महाविकास आघाडीमध्ये राहतील. त्यांनी चांगले काम केलं आहे. ते भोरसाठी योग्य निर्णय घेतील'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT