Shrikant Shinde News Saam tv
मुंबई/पुणे

Shrikant Shinde News : आफ्रिकन देशांच्या दौऱ्यातून काय साधलं? खासदार श्रीकांत शिंदेंनी सांगितली A टू Z माहिती, VIDEO

Shrikant Shinde Interview : आफ्रिकन देशाच्या दौऱ्यानंतर भारतात परतले आहेत. भारतात परतल्यानंतर दौऱ्याने काय साधलं, याची माहिती खासदार श्रीकांत शिंदेंनी दिली.

Vishal Gangurde

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि शिष्टमंडळ हे भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या मुद्द्यावरून आफ्रिकेतील ४ देशांच्या दौऱ्यावर गेलं होतं. या दौऱ्यात खासदार शिंदेंनी भारताची भूमिका मांडली. परदेशात पाकिस्तानचा बुरखा खासदार श्रीकांत शिंदेंनी फाडला. या आफ्रिकेच्या दौऱ्याने नेमकं काय साधलं, याची सविस्तर माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितली.

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती झाल्यानंतर सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांची हत्या केल्यानंतर भारत सरकारने काही दिवसांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. मागील काही दिवसांत भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटलं होतं. दोन्ही देशाचा तणावाकडे संपूर्ण जगाकडे लक्ष लागलं होतं. दोन्ही देशातील तणाव काहीसा निवळल्यानंतर भारताचं शिष्टमंडळ पश्चिम आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलं होतं. ४ देशांच्या दौऱ्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी भारताची भूमिका स्पष्टपणे मांडल्याचे मुलाखतीत सांगितलं.

आफ्रिका दौऱ्याने काय साधलं, यावर भाष्य करताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, 'पश्चिम आफ्रिकेत मुस्लीम राष्ट्र आहेत. पाकिस्तान तेथील राष्ट्रांमध्ये जातो. धर्माच्या नावाने दहशतवाद पसरवला जात आहे. तो मान्य करण्यासारखा नाही, हा संदेश द्यायला गेलो होतो. तिथे आम्ही सांगितलं की, आसिफ मुनीरने पाकिस्तानात हिंदू आणि मुस्लीम एकत्र राहू शकत नाही, असं सांगितलं. त्यानंतर सात दिवसांनी पहलगामची घटना घडली'.

'धर्म विचारून गोळ्या झाडल्या जातात. या परिस्थितीत यूएनएससी राष्ट्रांत पाकिस्तान आहे. तो तुमच्याजवळ येईल, तेव्हा त्यांना ही गोष्ट कळाली पाहिजे. यासाठी आम्ही तिथे दौरा केला. आम्ही थेट प्रश्न मांडले. पाकिस्तान धर्माच्या नावावर दहशतवाद पोसत आहे, असे ते म्हणाले.

'एकीकडे भारत प्रगती करत आहे. भारतात बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक एकत्र राहत आहेत. आपल्यासारखी पाकिस्तानात नाही. याचा विचार त्यांनी केला पाहिजे. पाकिस्तानात हिंदूंवर अत्याचार झाले. देश स्वतंत्र्य झाला. त्यानंतर पाकिस्तानात अल्पसंख्याकांची लोकसंख्या किती होती? भारतात अल्पसंख्याकांची लोकसंख्या किती? तुम्हाला परिस्थिती सांगतो. भारतात १९४७ साली भारतात मुस्लिमांची लोकसंख्या ३ कोटी पाच लाख होती. आता ती २१ कोटी झाली. पाकिस्तान हिंदूंची संख्या ४५ लाख होती. आता फक्त ४० लाख आहे. एकंदरीत पाकिस्तानात हिंदूंची संख्या घटली आहे. तर भारतात मुस्लिमांची संख्या वाढली आहे. आम्हाला सांगायचं होतं की, भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. त्यांना ते पटवून सांगायचं होतं. सर्व जण एकत्र राहतात. यूएईच्या मंत्र्यांना सांगितलं की, धर्माच्या आधारावरील दहशतवाद मान्य करणार नाही, असेही खासदार शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Solanke: मुंडेंच्या वापसीवर राष्ट्रवादीत नाराजी? कॅबिनेट मंत्रिपदावरून प्रकाश सोळंकेंचा पक्षश्रेष्ठींवर निशाणा

हृदयद्रावक! दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आली, बाप अन् २ मुलींचा मृत्यू, बारामतीत भयंकर अपघात

Maharashtra Live News Update: भिमाशंकर भोरगिरी परिसरात मुसळधार पावसामुळे निसर्गाचं सौंदर्य बहरलं

Potato Eating Tips : बटाटा सोलून खावा की सालीसकट? वाचा फायदे- तोटे

Ladki Bahin Yojana: लाडकींना सरकारकडून दणका, २६.३४ लाख महिला अपात्र; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT