शिक्षक भर्तीवरुन नवप्राध्यापक संघटनेचा तोंडाला काळं फासत सरकाराचा निषेध सागर आव्हाड
मुंबई/पुणे

शिक्षक भर्तीवरुन नवप्राध्यापक संघटनेचा तोंडाला काळं फासत सरकाराचा निषेध

कोरोनाच्या लॉकडाऊनचं कारण सांगत 18 हजार प्राध्यापकांची भर्ती रोखण्यात आली आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे: आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन (Teachers Day) शिक्षक, गुरू यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. पुण्यात शिक्षण आयुक्त कार्यालयाबाहेर (Office of the Commissioner of Education in Pune) मात्र आज मन उद्विग्न करणारं दृष्य पाहायला मिळालं. गेले 49 दिवस रखडलेली प्राध्यापक भर्ती करावी म्हणून कधी भजन आंदोलन, कधी अर्धनग्न आंदोलन करून लक्ष वेधणाऱ्या नवप्राध्यापक संघटनेतर्फे स्वतः च्या तोंडाला काळे फासून सरकारचा निषेध करण्यात आला आहे.

कोरोनाच्या लॉकडाऊनचं कारण सांगत 18 हजार प्राध्यापकांची भर्ती रोखण्यात आली आहे. या पैकी 4000 प्राध्यापकांची भर्ती केली जाईल हे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांचं आश्वासन अर्थमंत्री अजित पवारांनी फाईल रोखून धरल्यामुळे हवेत विरलय असा आरोप प्राध्यापकांनी केला आहे.

तर याच ठिकाणी गेली 15 वर्षे विना वेतन काम करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी प्रतिकात्मक केस कापत या आंदोलन केलं अनुदान मंजूर न झाल्याने सुमारे 1200 प्राध्यापक शेतात काम करत,भाजीपाला विकत उदरनिर्वाह करत आहेत आम्ही मुलाबाळांचसह जीव दिल्यावर सरकार जागे होणार का असा सवाल या आंदोलक प्राध्यापकांनी विचारला आहे या आंदोलनाचा आज 4 था दिवस आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जरांगेंनी सरकारला इशारा दिला, त्यावर भुजबळ काय म्हणाले?

Sakhi Gokhale: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लेकीने परदेशात घेतलंय शिक्षण; आज गाजवतेय इंडस्ट्री

Rahud Ghat Traffic : गॅस टँकर अपघातामुळे राहुड घाटात वाहतूक कोंडी कायम; मनमाड मार्गाने वळविली वाहतूक

'अजित पवारांचं पाप देवेंद्र फडणवीसांनी लपवलं, मोदींकडून पाठिंबा' विजय पांढरेंचा खळबळजनक आरोप

Actor Death Threats : जर तुझ्या आई, बहिणीला काहीही सांगितलंस...; प्रसिद्ध अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या

SCROLL FOR NEXT