Motorman Ashok Kumar Sharma रुपाली बडवे
मुंबई/पुणे

Mumbai: शाब्बास! रेल्वे ट्रॅकवर होता घातक अडथळा, मोटारमनच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला

Mumbai Local Train: मोटरमन अशोक कुमार शर्मा यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईची लाइफलाइन असलेल्या मुंबई लोकलचा (Mumbai Local) एक मोठा अपघात होता होता टळला आहे. मात्र मोटारमनच्या सतर्कतेमुळे अपघात टळला आहे. या मोटारमनचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mumbai Local Train Latest News)

हे देखील पाहा -

नेमकं काय घडलं?

जलद लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून गुरुवारी दुपारी ३:१० वाजता सुटली. यावेळी भायखळा स्टेशनदरम्यान रेल्वे ट्रॅकवर एक टिनचा ड्रम पडलेला होता. त्याचवेळी ही बाब मोटारमन अशोक शर्मा (Motorman Ashok Kumar Sharma) यांच्या लक्षात आली. यावेळी त्यांनी लगेचच आपत्कालीन ब्रेक लावला, पण तरिही ड्रम गाडीला धडकला आणि मोठा आवाज झाला. गाडी ड्रमला हिट होऊन पुढे जाऊन थांबली. मोटारमनने प्रथम ट्रेनला आपत्कालीन ब्रेक लावून सुरक्षित उभी केली आणि ट्रेनमधून खाली उतरुन पाहणी केल्यानंतर ड्रममध्ये दगड आणि खडी भरल्याचे त्यांच्या लक्षात आले.

जर गाडी वेगात असती तर जोरदार धडक झाली असती आणि त्यामुळे गाडीचा जंपर, वायर इत्यादी तुटून पडू शकत होते. परिणामी मोठा अपघात होऊ शकत होता. मात्र, मोटारमन अशोक शर्मा यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात होता होता टळला. त्यानंतर अशोक शर्मा यांनी प्रवाशांच्या मदतीने ड्रम बाहेर काढला. यादरम्यान गाडी १५ मिनिटे उशिराने सुरू झाली आणि गाडी वेळेवर कल्याण स्थानकात पोहोचली. या घटनेनंतर भायखळा येथील आरपीएफ, ठाणे येथे कलम १५४ अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटरमन अशोक कुमार शर्मा यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात आज एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद

Success Story: MBBS केलं, नंतर पहिल्याच प्रयत्नात USPC क्रॅक; IPS अधिकाऱ्याची लेक झाली IAS; सौम्या झा यांचा प्रेरणादायी प्रवास

Mangal Gochar: काही तासांनंतर मंगळ करणार बुधाच्या घरात प्रवेश; 'या' 3 राशींवर होणार सकारात्मक प्रभाव

Tuesday Horoscope : नागदेवतेची कृपा होणार; अचानक धनयोग येणार; ५ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस ठरणार फलदायी

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT