अपहरण झाल्याची तक्रार करणाऱ्या आईनेच 3 महिन्याच्या बाळाचा केला खून
अपहरण झाल्याची तक्रार करणाऱ्या आईनेच 3 महिन्याच्या बाळाचा केला खून Saam Tv
मुंबई/पुणे

अपहरण झाल्याची तक्रार करणाऱ्या आईनेच 3 महिन्याच्या बाळाचा केला खून

अश्विनी जाधव - केदारी

पुणे: तीन महिन्याच्या मुलीचे घरातून अपहरण झाल्याची तक्रार करणाऱ्या आईनेच आपल्या मुलीचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १३ वर्षाच्या मुलाच्या मदतीने महिलेने हा मृतदेह गोणीत नदीत फेकून दिल्याचं उघडकीस आलं आहे. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलीबाबत नातेवाईकांना काय कारण सांगायचे या भितीपाोटी तिनेच हे कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. येरवडा पोलिसांनी मुलीच्या आईला अटक केली असून १३ वर्षाच्या मुलालाही ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधीकची माहिती अशी, ही महिला अहमदनगरची असून मागील काही महिन्यांपासून ती येथे आपल्या भावाकडं रहायला आली आहे. ती घटस्फोटीत महिला असून तिला एक १३ वर्षांचा मुलगा देखील आहे. ३ महिन्यांपूर्वी तिने एका मुलीला जन्म दिला होता. २२ तारखेला घरात झोपले असताना आपल्या ३ महिन्याच्या मुलीला कोणीतरी पळवून नेल्याची तक्रार महिलेने येरवडा पोलिसांकडे केली. त्यानुसार येरवडा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन अधीकच्या तपासास सुरवात केली.मुलागा आणि महिला यांच्या बोलण्यात विसंगती आढळून आल्याने पोलिसांचा त्यांच्यावरील संशय वाढला.

चौकशी दरम्यान महिलेने कबूली दिली की मुलगी सतत रडत होती. तिचा जन्म अनैतीक संबंधातून झाला होता, त्यामुळे आपणच मुलाच्या साहय्याने मुलीला ठार मारले आणि मृतदेह नदीत फेकून दिला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने नदीत जाऊन शोध सुरु केला आणि मृतदेह आढळून आला. तो शवविच्छेदनाकरीता ससून रुग्णालयात पाठवून दिला.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : लोकसभेनंतर 'काँग्रेसी' एकत्र येणार?; प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?

Kolhapur Lok Sabha: कोल्हापूर लोकसभेचं मैदान कोण मारणार? वाढलेल्या टक्केवारीचा फायदा शाहू महाराजांना मिळणार की संजय मंडलिक यांना?

SRH vs LSG, IPL 2024: लखनऊच्या नवाबांना हैदराबादी दणका! ट्रॅव्हिस हेडने घातला विजयाचा 'अभिषेक'

Uddhav Thackarey: जे अदानी- अंबानींना दिलं ते काढून घेणारं का? उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींना सवाल

Today's Marathi News Live : मालदीवरून प्रकाश आंबेडकरांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT