Rescue teams including NDRF personnel conduct intensive operations after a massive garbage landslide buried a building at Moshi dump yard in Pune. saam tv
मुंबई/पुणे

पुण्यात काळाचा घाला! मोशी कचरा डेपोत ३ जणांचा बळी; २४ तासानंतरही ८ जण ढिगाऱ्याखालीच, ९ जणांना वाचवले

Pimpri Chinchwad Building Collapse: मोशी कचरा डेपोतील भीषण दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू, 9 जणांची सुखरूप सुटका तर 8 जण अजूनही अडकले. एनडीआरएफकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू.

Omkar Sonawane

सागर आव्हाड / गोपाल मोटघरे, साम टीव्ही

पुणे: मोशीतील कचरा डेपोत साठलेल्या कचऱ्याच्या डोंगराचे भूस्खलन होऊन त्याने ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या तीन मजली इमारतीलाच पोटात घेतले. या भीषण दुर्घटनेत इमारतीतील कामगार कचऱ्याखाली अडकले. त्यातील सहा जणांना बुधवारी सायंकाळपर्यंत सुखरूप बाहेर काढण्यात आले. तिघांना रात्री उशिरा सुखरूप बाहेर काढण्यात आले. रात्रभर बचावकार्य राबविण्यात आले आहे. उरलेल्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सोमनाथ शेळके (वय ४०), सचिन रामदास दबडगाव (वय ३२), दादासाहेब किसन आडे (वय ४६), सुजाता शिंदे (वय ४९), रामप्रतापसिंह चौहान (वय ३६), रणवीरसिंग (वय ६०) या सहा जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. विजय सपकाळ, भूषण पाटील, महेश राऊत यांना मध्यरात्री बाहेर काढण्यात यश आले.

एका महिलेसह 6जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले

कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणारा ‘वेस्ट टू एनर्जी’ हा प्रकल्प राबविला जातो. त्याचे काम अँथनी लारा या ठेकेदार कंपनीला देण्यात आले आहे. हा प्रकल्प, तसेच कंपनीची तीन मजली प्रशासकीय इमारत कचऱ्याच्या डोंगरालगतच धोकादायक पद्धतीने उभारण्यात आली होती. सर्व कामगार बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास जेवण्यासाठी कार्यालयातील उपाहारगृहात आले होते. त्या वेळी इमारतीवर कचऱ्याचा उंच डोंगर कोसळला. गेले पाच दिवस सातत्याने पाऊस येत असल्याने त्याचे भूस्खलन झाले. काही क्षणांत इमारत हजारो टन कचऱ्याखाली दबली. इमारत कोसळली, तेव्हा इमारतीत २३ कामगार होते. इमारत कोसळताच पाच जण तात्काळ बाहेर पडले.

असे राबवले बचावकार्य

घटनेची माहिती मिळताच महापालिका, अग्निशामक विभाग, एनडीआरएफ आणि पोलिसांच्या मदतीने तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लष्करालाही पाचारण करण्यात आले. देहूरोड येथील भारतीय लष्कराचे चार अधिकारी आणि २५ जवान घटनास्थळी आले. बचाव पथकांनी इमारतीची सर्व बाजूंनी पाहणी केली. इमारतीमध्ये माइक, छोटे ड्रोन सोडण्यात आले. माइकद्वारे कामगारांशी संपर्क साधण्यात आला.अडकलेल्या कामगारांना श्वसनाचा त्रास होऊ नये, याकरिता पाइपद्वारे प्राणवायू सोडण्यात आला. इमारतीच्या एका भिंतीला कटरच्या साहाय्याने मोठे भगदाड पाडण्यात आले. पहिल्या मजल्यावरील गज कापून स्लॅब फोडण्यात आले. त्यातून जवान खाली उतरले. त्यानंतर सायंकाळी सात वाजेपर्यंत एका महिलेसह सहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यांपैकी चार जणांच्या हाता-पायाला किरकोळ जखमा झाल्या आहेत. रात्री उशिरा तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

कचरा डेपोची क्षमता संपुष्टात

मोशीतील कचरा डेपोची निर्मिती १९९१ मध्ये झाली. गेल्या ३५ वर्षांपासून शहरातील कचरा येथील ८१ एकर जागेत जमा केला जातो. तेथे आता कचऱ्याचे डोंगर तयार झाले असून, डेपोची क्षमता संपुष्टात आली आहे. सन २०१७ मध्ये शहरात प्रतिदिन ८३२ टन कचरा निर्माण होत होता. आता १,५७९ टन कचरा निर्माण होतो. नऊ वर्षांत ७४७ टनांनी कचरा वाढला आहे. मात्र, जागा तेवढीच असल्याने आणि कचरा प्रकल्पाची क्षमता मर्यादित असल्याने कचऱ्याचे ढीगच्या ढीग साचून त्याचे डोंगर तयार झाले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील मोशी कचरा डेपो येथे झालेल्या इमारत दुर्घटनेत आतापर्यंत बचाव कार्य करणाऱ्या टीमने इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका कर्मचाऱ्यांचा बाहेर काढला आहे. तर आणखी दोन कर्मचाऱ्यांचे मृतदेह बचावकार्य करणाऱ्या टीमने शोधून काढले आहेत. मात्र ते मृतदेह अजूनपर्यंत बाहेर काढण्यात आले नाही. त्यामुळे मोशी येथील दुर्घटनेत आतापर्यंत तीन जणांचा अधिकृतरित्या बळी गेला आहे, आणि उर्वरित सहा कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी अजूनही बचाव कार्य युद्ध पातळीवर करण्यात येत आहे. अशी माहिती बचाव कार्य करणाऱ्या NDRF च्या टीम कमांडटने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्याचा फिरायला जायचा प्लॅन करताय? पण, मुंबई-पुण्याजवळील 'ही' प्रसिद्ध पर्यटनस्थळे ३१ ऑगस्टपर्यंत राहणार बंद

Today Gold Rate : सुवर्णनगरीत सोन्याला झळाळी, चांदीलाही चकाकी; पाहा आजचे ताजे दर

FIFA World Cup : विजय मिळाल्यानंतर एक चूक पडली महागात; इंग्लंडच्या खेळाडूचा हात फ्रॅक्चर, क्वार्टर फायनलला मुकणार, VIDEO

Extramarital Affair : अमेरिकेत पत्नीची हत्या, भारतातील गर्लफ्रेंडला फोटो; उच्चशिक्षित इंजिनिअरचं भयानक कृत्य

Smartphone Care Tips : फोनच्या स्क्रीनवर Liquid Detected चा इशारा येतो? मग टाळा या ७ चुका

SCROLL FOR NEXT