Corona Latest News Update Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईची चिंता वाढली, कोरोनाची आजची आकडेवारी धडकी भरवणारी

मुंबईत कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी वाढ नागरिकांसाठी चिंतेची बाब बनली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबईत कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत (Mumbai corona update) होणारी वाढ नागरिकांसाठी चिंतेची बाब बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वी कोरोनाच्या रुग्णसंख्येने (corona new patients) पाचशेचा टप्पा पार केला होता. मात्र, आजच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याने कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा ७७३ वर पोहोचला आहे. यापैकी ३७ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच आज एकाही कोरोना रुग्णाचा (corona death) मृत्यू झाला नाही. त्यामुळे कोरोना मृतांची संख्या १९,५६७ स्थिरावली आहे.

मुंबई महापालिकेने दिलेल्या रिपोर्टनुसार, मुंबईत दिवसभरात ७६३ नव्या कोरना रुग्णांची नोंद करण्यात आलीय. त्यामुळे मुंबईतील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या १,०६८,००८ पोहोचली आहे. आज कोरोनाच्या नव्या ३७ रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर १३६ रुग्ण हे उपचाराधीन आहेत.

दरम्यान, कोरोनाचे ३५२ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून आतापर्यंत कोरोनाचे १,०४४,७०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच सक्रिय रुग्णांची संख्या ३७३५ वर पोहोचली आहे. मुंबईतील कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्क्यांवर पोहोचला असून रुग्ण दुपटीचा दर १५७६ दिवसांवर पोहोचला आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat near waterfall: कर्जतपासून अवघ्या 20 किमीवर लपलाय 'हा' धबधबा; पावसाचा आनंद घेण्यासाठी बेस्ट ठिकाण

Shravan Month 2025: श्रावण महिन्यात काय करावे अन् काय करू नये?

Maharashtra Live News Update : आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक

Low Cost Bike: कमी बजेटमध्ये जास्त फायदे! ‘या’ १० बाईक्स अजूनही किफायतशीर

Paneer Cutlet Recipe: छोट्या भूकेसाठी १० मिनिटांत बनवा खंमग पनीर कटलेट

SCROLL FOR NEXT