Baba Maharaj Satarkar saam tv
मुंबई/पुणे

Baba Maharaj Satarkar : बाबामहाराज सातारकरांचे स्मारक राज्य सरकार उभारेल : देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबामहाराज सातारकर यांचे निधन ही वारकरी संप्रदायाची फार मोठी हानी आहे असेही फडणवीस यांनी नमूद केले.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai News : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर (Baba Maharaj Satarkar) यांचे स्मारक राज्य सरकार उभारेल अशी घाेषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (शुक्रवार) येथे केली. फडणवीस यांनी बाबामहाराज सातारकरांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यानंतर कुटुंबियांचे सांत्वन केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फडणवीस म्हणाले सातारकर कुटुंबाची खूप मोठी परंपरा वारकरी संप्रदायात राहिली आहे. त्यांची चाैथी पिढी अध्यात्मच्या कार्यात आपल्याला पाहायला मिळत आहे. बाबामहाराज सातारकर यांनी अध्यात्मात नवीन बदल घडवल्याने नवीन प्रवचनकार ,कीर्तनकार तयार झाले. (Maharashtra News)

फडणवीस पूढे म्हणाले त्यांच्या वाणीत गोडवा होता. सामान्य माणसाला त्यांचे विचार पटेल असे त्याचे प्रवचन होते. जनमानसात त्यांची वेगळी प्रतिमा आहे. त्यांच्या स्मारकबाबत मी कुटुंबीयांशी चर्चा केली असून,त्यांच्या विचाराचे स्मारक व्हायला हवे यासाठी प्रयत्न करू असेही फडणवीस यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

Jio New Recharge Plan: भन्नाट ऑफर! १०० रुपयांत मिळणार हजारो रुपयांचे फायदे; डेटा, मनोरंजन आणि अतिरिक्त ऑफर्स फ्री

Success Story: सरकारी नोकरी सोडली, UPSC परीक्षेत दोनदा फेल, जिद्द नाही सोडली, तिसऱ्या प्रयत्नात IAS; सर्जना यादव यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT