महिनाभराच्या विश्रांतीनंतर अखेर जिल्ह्यात पावसाचे आगमन  Saam Tv
मुंबई/पुणे

महिनाभराच्या विश्रांतीनंतर अखेर जिल्ह्यात पावसाचे आगमन

मागील महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने आज परत दुपारपासून ठाणे जिल्ह्यात जोरदार कमबॅक केलं

अजय दुधाणे

उल्हासनगर : मागील महिनाभरापासून Month दडी मारलेल्या पावसाने Rain आज परत दुपारपासून ठाणे Thane जिल्ह्यात District जोरदार कमबॅक केलं आहे. या पावसाने वातावरणात निर्माण आलेल्या उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ठाणे जिल्ह्यात महिनाभराअगोदर झालेल्या अतिवृष्टीमुळे heavy rains अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.

हे देखील पहा-

मात्र, त्यानंतर पावसाने मोठ्या कालावधीचा दडी मारला होता. त्यातच तापमान सुद्धा वाढू लागल्याने पावसाळा संपला की काय? आणि ऑक्टोबर हिटच्या झळा आत्तापासूनच बसू लागले की काय? असे वाटू लागले होते. मात्र, आज दुपारपासून ठाणे जिल्ह्यात परत एकदा पावसाने पुनरागमन केले आहे. जिल्ह्यातील शहरी City आणि ग्रामीण Rural भागात पावसाची संततधार पाहायला मिळत आहे.

अंबरनाथ Ambernath, बदलापूर Badlapur, उल्हासनगर Ulhasnagar आणि आसपासच्या ग्रामीण भागात दुपारपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे या भागात वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या बदलापूरच्या बारवी धरणक्षेत्रात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे यावर्षी अजूनही न भरलेलं हे धरण आता भरेल, आणि ठाणे जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटेल, अशी आशा आता निर्माण झाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

SCROLL FOR NEXT