Palghar Rain Update Saam TV
मुंबई/पुणे

Heavy Rainfall in Maharashtra : मुंबईसह ठाणे, पुण्यात पावसाचा कहर; राज्यातील 'या' शहरातील शाळांना सुट्टी जाहीर

Heavy Rainfall in various part of maharashtra : मुंबईसह ठाणे, पुण्यात पावसाचा कहर पाहायला मिळाला. राज्यातील काही भागात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

ठाणे : मुंबईसह ठाणे, पुण्यात पावसाचा कहर पाहायला मिळाला. हवामान विभगाने या भागात उद्या देखील मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पुणे, पालघर आणि ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

आज बुधवारी मुसळधार मुंबईसह ठाणे आणि पुण्याला चांगलंच झोडपलं. या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलेलं पाहायला मिळालं. यामुळे नागरिकांना सखल भागातील साचलेल्या पाण्यातून मार्ग काढून घर गाठावं लागलं आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक जण तासंतास वाहनातच अडकून बसले. या पावसामुळे मुंबईतील रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झालाय. तर रस्त्यावरही मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. तर हवामान विभागाने उद्या देखील अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने मुंबई,ठाणे, पालघर, पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर

ठाण्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवल्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

पालघर जिल्ह्यात उद्या रेड अलर्ट असून मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर उद्या पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून पालघर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, मागील दोन तासांपासून पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.r

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाने वादळ आणि विजेच्या कळकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आदेश जारी केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT