Five monkeys enter a Shivne housing society in Pune, creating panic among residents after recent leopard sightings. saam tv
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात बिबट्यानंतर माकडांची दहशत, सोसायटीत माकडांची घुसखोरी

Monkey Gang Invades Pune Society : पुण्यात बिबट्यानंतर आता वानरांची दहशत पहायला मिळालीये. अन्नाच्या शोधात वानर सोसायट्यांमध्ये घुसतायेत. त्यामुळे मुलांसह पालकांनी धास्ती घेतली आहे. पाहूया एक रिपोर्ट.

Girish Nikam

  • पुण्यातील शिवणे भागात पाच वानरांची टोळी सोसायटीत आली आहे.

  • अन्नाच्या शोधात हे वानर मानवी वस्तीत येत आहेत.

  • माकडांच्या टोळ्यांची थेट सोसायटीत घुसखोरी सुरू

बिबट्यानं पुणेकरांची आधीच झोप उडवलीय. कारण औंधच्या सिंध सोसायटीमध्ये बिबट्याचं दर्शन झालंय. बिबट्याची शोध मोहीम सुरु असतानाच आता पुण्यात माकडांची दहशत निर्माण झाली आहे. पुण्यातील शिवणे भागात पाच वानरांची टोळी सोसायटीत आली. त्यामुळे बच्चे कंपनी घाबरली आहे. हल्ला करण्याच्या भितीने पालकांनीही या माकडांची धास्ती घेतली आहे.

शिवणे भागातील विष्णूपुरम सोसायटीत पाच वानरांनी धुमाकूळ घातला. थेट सोसायटीच्या आत माकडं येत असल्यानं रहिवाशांमध्ये भिती पसरली आहे. अन्नाच्या शोधात हे वानर मानवी वस्तीत येत आहेत. वनविभागाने त्वरीत या वानरांना ताब्यात घ्यावे, अशी मागणी होत आहे. काही माकडं थेट कंपाऊंडच्या भिंतीवर बसत असल्याने लहान मुलांमध्ये भीतीचं वातावरण आहे. माकड हल्ला करेल अशी भिती मुलांना आहे.

यापूर्वी पुणे शहरात रानगवे आले होते. सद्यस्थितीत शहरात बिबट्याचा वावर असतानात आता माकडांच्या टोळ्याही थेट सोसायटीत घुसखोरी करू लागल्यानं पुणेकरांची चिंता वाढलीय. मात्र हे प्राणी मानवी वस्तीत का येतायेत त्याची कारणेही तपासणे महत्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Famous Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, VIDEO होतोय व्हायरल

Raj Thackeray: 'यांना मुंबई हे नाव खटकतंय...' केंद्रीय मंत्र्याला राज ठाकरेंनी झापलं

Guru Gochar 2025: पुढच्या वर्षी या राशींवर गुरुची राहणार कृपा; अडकलेला पैसा आणि नवी नोकरीही मिळू शकते

Railway Recruitment: खुशखबर! कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी; ४११६ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT