Pune Metro Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Metro: मोदी सरकारकडून पुणेकरांना खूशखबर, पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी; १३ नवीन स्टेशन

Pune Metro 2: पुणे मेट्रोचा लवकरच विस्तार होणार आहे. पीएम मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पुणे मेट्रो २ प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. या मार्गावर १३ स्टेशन असणार आहेत.

Priya More

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यातील मेट्रोचा आता विस्तार होणार आहे. पुणे मेट्रोच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंळडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आज पीएम मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीत पुणे मेट्रो रेल प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली आहे. वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली/ विठ्ठलवाडी कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आली.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज पुणे मेट्रोच्या २ नवीन उन्नत मार्ग निर्माणाला मंजुरी देण्यात आली. पुणे मेट्रो रेल प्रकल्पाचा टप्पा २ वनाझ ते चांदणी चौक (कॉरिडॉर २अ) आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडॉर २ब) या प्रकल्पाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. विद्यमान पुणे मेट्रो टप्पा-१ वनाझ-रामवाडीचा आता विस्तार होणार आहे. हे दोन उन्नत कॉरिडॉर १२.७५ किमी लांबीचे असतील आणि त्यात १३ स्थानके असतील. चांदणी चौक, बावधन, कोथरूड, खराडी आणि वाघोली यासारख्या जलदगतीने विकसित होणाऱ्या उपनगरांना मेट्रो जोडली जाणार आहे. हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अंदाजे खर्च ३६२६.२४ कोटी रुपये आहे. हा खर्च केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि बाह्य द्विपक्षीय/ बहुपक्षीय एजन्सींनी समान प्रमाणात वाटन घेणार आहे. पुणे मेट्रोच्या या नव्या टप्प्यामुळे पुण्यातील पूर्व-पश्चिम सार्वजनिक वाहतूक मजबूत करण्यासाठी चांदणी चौक ते वाघोली मेट्रो कॉरिडॉर तयार केला जाणार आहे. या विस्तारांमुळे पौड रोड आणि नगर रोड सारख्या प्रमुख मार्गांवर गर्दी कमी होण्यास मदत होईल. पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा तयार झाल्यानंतर याचा मोठा फायदा प्रवाशांना होणार आहे आणि वाहतूक कोंडी देखील कमी होणार आहे.

पुणे मेट्रोचा विस्तार प्रमुख आयटी हब, व्यावसायिक क्षेत्रे, शैक्षणिक संस्था आणि निवासी क्षेत्रांना सेवा देतील. ज्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वाटा आणि नेटवर्कमधील प्रवाशांची संख्या वाढेल. नवीन कॉरिडॉर जिल्हा न्यायालय इंटरचेंज स्टेशनवर लाईन-१ (निगडी-कात्रज) आणि लाईन-३ (हिंजवडी-जिल्हा न्यायालय) सोबत देखील एकत्रित केले जातील. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास आणखी सोपा होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT