Maharashtra Politics  Saam tv
मुंबई/पुणे

MNS- Shivsena: मुहूर्त ठरला! १८ डिसेंबरला होणार मनसे-शिवसेना युतीची घोषणा? राज ठाकरे- संजय राऊत यांच्यात काय चर्चा झाली?

MNS- Shivsena Alliance: मनसे- शिवसेना युतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. येत्या १८ डिसेंबरला शिवसेना- मनसे युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. संजय राऊत आणि अनिल परब यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेत चर्चा केली.

Priya More

Summary -

  • महापालिका निवडणुकांपूर्वी मनसे- शिवसेना युतीच्या हालचालींना वेग आला

  • संजय राऊत आणि अनिल परब यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

  • तिन्ही नेत्यांमध्ये ४० मिनिटे युतीवर सविस्तर चर्चा

  • १८ डिसेंबरला युती जाहीर होण्याची शक्यता

निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीची घोषणा केल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. सर्व राजकीय पक्षांच्या बैठकावर बैठका सुरू झाल्या असून युती-आघाडी, जागावाटपाच्या घडामोडींना वेग आला आहे. अशामध्ये मनसे-शिवसेना युतीची देखील जोरदार चर्चा होऊ लागली आहे. आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीत युतीबाबत चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे. तसंच, येत्या दोन दिवसांत म्हणजे १८ डिसेंबरला युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आज शिवसेना नेते संजय राऊत आणि अनिल परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या नेत्यांमध्ये महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. जवळपास ४० मिनिटं या नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर मनसे आणि ठाकरेसेनेच्या युतीची अधिकृत घोषणा १८ डिसेंबरला होणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे. तर युतीची घोषणा होण्यासाठी ९ आकडा महत्वाचा मानला आहे. त्यामुळे १ + ८ म्हणजे १८ डिसेंबर हा युतीच्या घोषणेसाठी मुहूर्त असल्याचे म्हटले जात आहे.

महापालिका निवडणुकीसाठी कमी दिवस उरले आहेत. त्यामुळे नेते, पदाधिकारी आणि सर्वांपर्यंत युतीची अधिकृत घोषणा होणं गरजेचे आहे. त्यानंतरच स्थानिक पातळीवर कार्यकर्ते एकत्र येऊन काम करू शकतील अशी चर्चा आजच्या या बैठकीत झाली असल्याची माहिती मिळत आहे. १८ डिसेंबरला म्हणजे गुरूवारी युतीची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. कुठे आणि कोणत्या पद्धतीने घोषणा करायची आणि किती व्यापक स्वरूपात करायची यासंदर्भात राज ठाकरे आणि शिवसेना नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे.

मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही नेते एका व्यासपीठावर आले होते आणि त्यांनी शक्तीप्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले होते. तशाच पद्धतीचे शक्तीप्रदर्शन करून युतीची घोषणा केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मराठीचा मुद्दा आणि मराठी महापौर या दोन्ही मुद्द्यांना अनुसरून हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन आगामी पालिका निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी १८ तारखेचा मुहूर्त ठरवण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. जर मनसे आणि शिवसेनेची युती झाली तर मुंबईसह राज्यातील राजकारणाची अनेक समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure: रोजच्या या ४ चुकांमुळे वाढतो BP; वेळीच व्हा सावध, डॉक्टरांनी सांगितली महत्वाची माहिती

IAS Transferred: राज्यातील प्रशासनात मोठा फेरबदल; २४ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या जिल्ह्यात कोण कलेक्टर? जाणून घ्या

Tissue Saree Drape Tips: टिश्यू साडी अंगावरुन निसटतेय? या टीप्स वापरुन नेसा साडी, दिसेल परफेक्ट

Maharashtra Live News Update : पालघरमध्ये बस चालकाची दादागिरी; प्रवाशावर संताप

नांदेडमध्ये मध्यरात्री रक्तरंजित गँगवॉर; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा खून, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT