Maharashtra Politics: शिंदेसेना 50-50 फॉर्म्युल्यावर ठाम? भाजपला खिंडीत गाठण्याची रणनीती?

BJP vs Shinde Sena: राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांची घोषणा केली...मात्र शिंदेसेनेनं भाजपला खिंडीत गाठण्यासाठी नवी खेळी केलीय..मात्र ही खेळी काय आहे...आणि शिंदेसेनेच्या फॉर्म्युल्याने भाजपची कशी पंचाईत झालीय..
BJP and Shinde Sena seat sharing dispute
BJP and Shinde Sena seat sharing disputeSaam Tv
Published On

राज्यात महापालिका निवडणुकांचा बिगूल वाजलं असतानाच शिंदेसेनेनं मात्र भाजपला खिंडीत गाठण्यासाठी नवं अस्त्र उपसलंय.... त्यामुळे भाजप आणि शिंदेसेना पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता आहे...कारण शिंदेसेना भाजपसमोर 50-50 चा फॉर्म्युला ठेवणार असल्याची माहिती समोर आलीय...मात्र हा 50-50 फॉर्म्युला नेमका कसा असणार आहे..

शिंदेसेना 50-50 फॉर्म्युल्यावर ठाम?

मुंबईसह सर्वच महापालिकांमध्ये 50-50 फॉर्म्युल्याचा आग्रह

2017 मध्ये धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेल्या जागा स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न

मुंबईत शिंदेसेनेकडे 125 माजी नगरसेवकांचं संख्याबळ असल्याचा दावा

भाजपच्या विजयी जागा सोडून इतर जागांवर शिंदेसेना दावा करणार

खरंतर नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत शिंदेसेना आणि भाजप आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं... एकमेकांवर टोकाची टीकाही झाली... त्याच दरम्यान भाजपनं ऑपरेशेन लोटस राबवून शिंदेसेनेला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न केला.... मात्र शिंदेनंतर रवींद्र चव्हाण यांनी अमित शाहांची भेट घेतली.. या भेटीत शाहांनी चव्हाणांना सबुरीचा सल्ला दिला... त्यामुळे भाजपनं मुंबई 150 पारचा नारा दिला असला तरी शिंदेसेनेनं आपली बार्गेनिंग पॉवर वाढण्याचा प्रयत्न सुरु केलाय... मात्र भाजपनं शिंदेसेनेचा दावा फेटाळून लावलाय..

आता महापालिका निवडणुका महायुतीतच लढणार, अशी भूमिका महायुतीचे नेते घेत आहेत... त्यामुळे जागा वाटपासाठी भाजपच्या 4 आणि शिंदेसेनेच्या 6 नेत्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आलीय. ही समिती जागा वाटपाचा तिढा सोडवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय... त्यामुळे आता महापालिकेत तडजोडीची भूमिका स्वीकारून भाजप शिंदेसेनेसोबत लढणार की नगरपालिकेसारखाच सामना पाहयला मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com