MNS Worker Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News : मनसे पदाधिकाऱ्याकडून महिलेला मारहाण; घटनेचा VIDEO व्हायरल

या मारहाणीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai MNS News : राज्यात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात असताना मुंबईतून (Mumbai) एक धक्कादायक घटना समोर आलीय. गणेश भक्तांच्या स्वागताचा बॅनर लावायला विरोध केल्याने मनसे (MNS) पदाधिकाऱ्याने महिलेला मारहाण केल्याचं समोर आलंय. माहितीनुसार, मुंबईच्या मुंबादेवी परिसरात ही घटना घडली. या मारहाणीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. (Mumbai MNS News)

नेमकं काय घडलं?

मुंबईत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. अशातच गणेशभक्तांकडून ठिकठिकाणी बाप्पाच्या स्वागताचे बॅनर सुद्धा लावण्यात येत आहेत. अशातच गणेश भक्तांच्या स्वागताचा बॅनर लावायला महिलेनं विरोध केला म्हणून मनसे पदाधिकाऱ्याने सदरील महिलेला मारहाण केली. ही घटना २८ ऑगस्ट रोजी घडली असल्याची माहिती आहे. (Mumbai MNS Division Chief Beaten Women News)

विनोद आग्रिले असं या मनसे पदाधिकाऱ्याचं नाव आहे. सदरील घटना कामाठीपुरा गल्ली नंबर ८ मध्ये घडली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. आपल्या मेडिकल दुकानसमोर बॅनर लावू दिलं नाही म्हणून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे.

मारहाणीचा व्हिडीओ समोर येताच, या पदाधिकाऱ्यावर कलम ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच या पदाधिकाऱ्याला अटक देखील होण्याची शक्यता आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gavar Side Effects : गवार खाणं 'या' लोकांसाठी ठरू शकत धोकादायक! 'ही' ६ कारणे वेळीच घ्या जाणून

Konkan Forts : समुद्राच्या लाटांपासून जंगलाच्या कुशीत, कोकणातील 'हे' ५ किल्ले आहेत खूपच खास

LPG Cylinder : शहरी आणि ग्रामीण भागातल्या LPG ग्राहकांना दुसरा गॅस सिलिंडर कधी बुक करता येणार? नवीन अपडेट समोर

Avocado Benefits: रोज एक अव्होकॅडो खाल्ल्याने काय होतं? जाणून घ्या शरीराला मिळणारे 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Maharashtra News Live Update: सत्ताधारी पक्षाच्या माजी महापौरांचे उपायुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या

SCROLL FOR NEXT