Raj vs Brij Bhushan
Raj vs Brij Bhushan Saam Tv
मुंबई/पुणे

MNS News: मनसे नरमली! राज ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून रोखणाऱ्या भाजप खासदारांबाबत 'अतिथी देवो भव:'ची भूमिका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत, मुंबई

Raj Thackeray Latest News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आवाहन देणारे उत्तर प्रदेशमधील भाजपचे खासदार बृजभूषण सिंग यांच्याबाबत मनसेने मवाळ भूमिका घेतली आहे. बृजभूषण सिंग (Brij Bhushan Singh) हे लवकरच पुण्यात येणार आहे. मात्र सिंग यांना विरोध करणार नाही. त्यांच्या दौऱ्यावर कोणत्याही नेत्याने आणि पदाधिकाऱ्याने बोलू नये, असे आदेशच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिले होते. त्यानंतर आज मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. राज्याची संस्कृती 'अतिथी देवो भवः' अशी आहे त्यामुळे बृजभूषण सिंह आले तर त्यांना कसलाच त्रास देणार नाही असं नांदगावकर म्हणाले आहेत. (Brij Bhushan Singh Latest News)

... तर त्यांनी राज ठाकरे यांना भेटावं

मनसेचे (MNS) नेते बाळा नांदगावकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी ते म्हणाले की, राज्याची संस्कृती अतिथी देवो भवः अशी आहे. ते आले तर त्यांना कसलाच त्रास देणार नाही. बृजभूषण यांच्या मनात काही समज गैरसमज असतील तर त्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना भेटावं असं आवाहन नांदगावकर यांनी केलं आहे. तसेच मनसे नेते अमय खोपकर यांच्याबाबच ते म्हणाले की, अमेय खोपकर यांनी त्यांची भावना व्यक्त केली आहे, मी पार्टीची भूमिका मांडतो आहे. (Maharashtra News)

...तर आम्ही देखील आंदोलन करू

यावेळी नांदगावकर यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावरही भाष्य केलं आहे. ते म्हणाले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बेताल वक्तव्य करणे चुकीचे आहे. राज्याचे खासदार मोदींना भेटले. आपल्याला स्वतःला भान असले पाहिजे आपण काय बोलतो. आम्ही कन्नड बांधवांबद्दल भूमिका घेतली नाही. जाणून-बुजून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलतात त्यामुळे वेळ आली तर आम्ही देखील आंदोलन करू असा इशारा बाळा नांदगावकर यांनी दिला.

बृजभूषण सिंह पुण्यात कशासाठी येणार?

महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वातील सर्वात प्रतिष्ठेची असणाऱ्या 'महाराष्ट्र केसरी'स्पर्धा ११ ते १५ जानेवारीदरम्यान पुण्यात आयोजन करण्याचा मान संस्कृती प्रतिष्ठानला मिळाला आहे. या संदर्भात कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाची अधिकृत जबाबदारी संस्कृती प्रतिष्ठानला दिल्याचे पत्र भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंह यांच्याकडून स्वीकारल्याची माहिती संयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना ब्रिजभूषण सिंह यांच्या हस्ते लावण्यात येणार आहे, त्यानिमित्ताने काही दिवसात ब्रिजभूषण पुण्यात येतील.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत पुन्हा राज गर्जना

दरम्यान राज ठाकरे लवकरच मुंबईत जाहीर सभा घेणार आहेत. आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मुंबईत जाहीर सभा घेणार आहेत. या जाहीर सभेत राज्यात सुरू असलेल्या सर्वच मुद्द्यांना राज ठाकरे हात घालणार आहेत. गोरेगाव मेळाव्यानंतर राज ठाकरे जाहीर सभेतून मुंबईकराना साद घालणार आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : मतांची टक्केवारी वेबसाईटवर जाहीर करण्यास अडचण काय? सुप्रीम कोर्टाचा आयोगाला सवाल

Curd Benefits: वजन कमी करण्यासाठी खा दही, होतील अनेक फायदे

Pune Crime: पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खुनाचा थरार! डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या; कोंढव्यातील घटना

Today's Marathi News Live: भिंडेच्या कंपनीचे दादरमध्ये ८ अनधिकृत होर्डिंग

Uddhav Thackeray: आमचं सरकार सत्तेत आल्यावर 'त्या' पोलिसांवर कारवाई करणार; उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

SCROLL FOR NEXT