महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुणे महापालिकेसाठी ४४ उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. पुणे शहरासाठी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या कोट्यातील जागा मनसेला देण्यात आल्या आहेत. यामध्ये पुण्यातील स्थानिक मनसे नेते यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.
मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर पुण्यात सुद्धा हा पॅटर्न कायम राहील अशी अपेक्षा सगळ्यांना होती. असं असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ९१ आणि मनसे ७४ जागा लढवेल असा एक फॉर्म्युला तयार करण्यात आला होता. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये मनसेला सामावून घेतलं जाईल आणि ४ पक्षांची एक आघाडी तयार होईल असं चित्र असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आघाडीमधून एक्झिट घेतली.
मनसे आणि शिवसेना उबाठा यांच्या नेत्यांची एक बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीला शिवसेना उबाठाचे नेते सचिन अहिर आणि मनसेच्या स्थानिक नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि त्याच दिवशी त्यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यासोबत बैठक घेतली. दुसऱ्या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि शिवसेना उबाठाने त्यांचा फॉर्म्युला जाहीर केला; मात्र या पत्रकार परिषदेला मनसेचा एकही नेता उपस्थित नव्हता. यावेळी सचिन अहिर यांनी "मनसेशी अंतिम चर्चा सुरू असल्याचं सांगून त्यांना आम्ही आमच्या कोट्यातून जागा देऊ" असं आश्वासन दिलं.
पुणे शहरात मंगळवारी सर्व पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरला. सायंकाळपर्यंत मनसे वगळता सगळ्या इतर पक्षांची एबी फॉर्मची संख्या आणि त्यांचे फॉर्म्युला समोर आले. मनसेच्या जागा किती, ए बी फॉर्मचे वाटप किती, कुठल्या जागा असे प्रश्न मनसेच्या नेत्यांना विचारले असता अनेक जणांनी "अजून माहिती नाही", "यादी बनवत आहोत", "आमच्याकडे त्याची जबाबदारी नाही" अशी नकारात्मक उत्तरं दिली. आणखी खोलात जेव्हा याची माहिती घेतली असता एका नेत्याने "आदेश" आल्यानंतरच यादी प्रकाशित केली जाईल असं स्पष्ट केलं.
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेने बुधवारी संध्याकाळी यादी प्रसिद्ध केली. पुणे शहरात मनसेने ४१ प्रभाग मिळून एकूण ४४ उमेदवार मैदानात उतरवले आहेत. यामध्ये मनसे नेते राजेंद्र वागसकर यांनी प्रभाग क्रमांक १४ कोरेगाव पार्क मुंढवा प्रभागातून उमेदवारी अर्ज भरला आहे. यासह पक्षाचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी प्रभाग क्रमांक कोंढवा कौसर बाग या प्रभागातून उमेदवारी अर्ज भरला आहे. यासह शहरातील इतर प्रभागातून प्रल्हाद गवळी, निलेश हांडे, अमृता भोकरे, आशिष साबळे, आरती सहाणे, राम बोरकर, किशोर शिंदे या मनसे नेत्यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.
प्रभाग २: पाटील गणेश संजय, शिर्के दिपाली महेंद्र
प्रभाग ५: गाडे ज्ञानेश्वर उद्धव
प्रभाग ६: काते लक्ष्मण नामदेव, अर्चना कांतीलाल माछरेकर, ठोकळ रूपाली मनोज, मदने रोहित सिद्धेश्वर
प्रभाग ७: धेंडे सपना आकाश, साठे अंजनेय सुनील, विनायक कोतकर
प्रभाग ८: रणदिवे दत्तात्रय विठोबा
प्रभाग ९: सुतार मयूर
प्रभाग १०: गोरडे राजेंद्र, वेडेपाटील स्वाती राजेंद्र
प्रभाग ११: स्नेहल गणेश शिंदे, अर्चना सागर भगत
प्रभाग १३: जाधव आनंद विलास, काची दीपाली रामसिंग
प्रभाग १४: राजेंद्र वागसकर
प्रभाग १५: कुलदीप यादव, देवकर निता दीपक
प्रभाग १९: मोबिना अहमद खान, बाबर साईनाथ
प्रभाग २१: तिडे मारुती सखाराम, हिरेमठ जयराज शिवमूर्ती
प्रभाग २२: कांबळे लक्ष्मी राजेंद्र, भोसले संजय बबनराव
प्रभाग २३: गवळी प्रकाश
प्रभाग २५: भोकरे अमृता गणेश, हांडे निलेश
प्रभाग २६: सहाणे आरती रोहिदास, साबळे पाटील आशिष
प्रभाग २९: राम बोरकर
प्रभाग ३०: विप्र सचिन मुकुंद
प्रभाग ३१: शिंदे किशोर, सुप्रिया संजय काळे
प्रभाग ३२: धीवार दिपाली संजय, धुमाळ गणेश वसंत, दांगट भाग्यश्री कैलास, शेख रियाज मोहिदीन
प्रभाग ३३: पांगारे दिपाली सचिन
प्रभाग ३६: शिंदे कुशल बळवंत
प्रभाग ३७: साठे संतोष अप्पा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.