Raj Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray: कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत राज ठाकरेंची एन्ट्री; पत्रक जारी करत म्हटलं...

अंधेरी पोटनिवडणुकीतही राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पत्र लिहिलं होतं.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : कसबा आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण करुन राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीला निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीच्या वेळी भाजपने जो उमदेपणा दाखवला तोच आता महविकास आघाडीने दाखवावा. ही राज्याची प्रगल्भ संस्कृती देशाला दाखवण्याची संधी असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीतही राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पत्र लिहिलं होतं. आता कसबा आणि पिंपरी चिंचवड निवडणुकीसाठीही राज ठाकरे पुढे आले आहेत. राज ठाकरे यांनी यासाठी पत्रक जारी केलं आहे.

राज ठाकरे यांनी नेमंक काय म्हटलं?

महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांच नुकतंच दुःखद निधन झालं. ह्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिडणूका होत आहेत.

मी अगदी सुरुवातीपासून ह्या मताचा आहे की, जेंव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेंव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी.

कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एक प्रकारे, राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानभूती दाखवेलच असं नाही.

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके ह्यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यावेळेस मी देवेंद्र फडणवीस ह्यांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आव्हान केलं होतं. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली.

आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वाना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : पोस्टल मतदानात मविआ आणि महायुतीत काँटे की टक्कर

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

SCROLL FOR NEXT