Thane News: जितेंद्र आव्हाडांचं टेन्शन वाढलं; निकटवर्तीय नजीब मुल्ला खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भेटीला

जितेंद्र आव्हाड यांचा खंदे समर्थक मानले जाणारे नजीब मुल्ला यांनी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
Thane News
Thane NewsSaam TV
Published On

ठाणे : राष्ट्रवादीचे काही नगरसेवक शिंदे गटात अर्थात बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याबाबतची बॅनरबाजी देखील गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. यादरम्यान राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा खंदे समर्थक मानले जाणारे नजीब मुल्ला यांनी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि प्रदेश सचिव नजीब मुल्ला यांनी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. मागील अनेक दिवसांपासून ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा असतानाच नजीब मुल्ला यांनी श्रीकांत शिंदे यांना शुभेच्छा दिल्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत. (Political News)

Thane News
Raj Thackeray: कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत राज ठाकरेंची एन्ट्री; पत्रक जारी करत म्हटलं...

ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षातील काही नगरसेवक येत्या १२ फेब्रुवारी रोजी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळेच नजीब मुल्ला यांनी वाढदवसानिमित्त घेतलेली ही भेट खूप महत्वाची मानली जात आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नजीब मुल्ला कुठेही जाणार नाही असं स्पष्ट म्हटलं होतं.

Thane News
Digha Railway Station: दिघा रेल्वे स्टेशन लवकरच सुरु होणार, बांधकाम पूर्ण; उद्घाटनाची तारीख ठरली?

कळवा-मुंब्र्यातील जनता तुमची गद्दारी माफ करणार नाही. अशा आशयाचे बॅनर लावत एकप्रकारे राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत असणाऱ्यांना नगरसेवकांना इशारा देण्यात आला होता.त्यामुळे ठाण्यातील राजकारणात कोणती नवीन समीकरणं तयार होतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com