Shahad Railway Station News Saam Tv
मुंबई/पुणे

MNS Raj Thackeray : हे हिंदी हवं कशाला? स्टेशनच्या नावावरून राज ठाकरे भडकले, नेमकं काय घडलं ?

Shahad Railway Station: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेनंतर शहाड रेल्वे स्थानकावरील ‘सहद’ हा हिंदी शब्द हटवण्यात आला आहे. आता फलकावर केवळ मराठीत ‘शहाड’ असे लिहिले आहे. या कृतीचे मनसे कार्यकर्त्यांकडून आणि नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Alisha Khedekar

  • राज ठाकरे यांच्या सूचनेनंतर शहाड स्थानकावरील हिंदी शब्द हटवण्यात आला.

  • मनसे कार्यकर्त्यांनी तात्काळ कृती करत स्टेशनच्या नावाचा फलक बदलला.

  • रेल्वे प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला गेला होता.

  • मराठी पाट्यांच्या प्रश्नावर मनसेची ठाम भूमिका पुन्हा अधोरेखित झाली.

राज्यात हिंदी मराठी भाषिक वाद उफाळलेला असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंबरनाथ दौऱ्यावर असताना केलेली कृती सध्या चर्चेचा विषय बनली आहे. मराठी पाट्यांवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतल्याने या आधीच अनेक दुकानांवर पुन्हा मराठी नावे दिसू लागली आहेत. राज ठाकरे यांनी दिलेला आदेश त्यांचे कार्यकर्ते कधी मोडीत काढत नाहीत हे अनेकदा दिसून आलं. मराठी भाषेच्या जतनासाठी त्यांनी प्रत्येकवेळी ठोस पाऊल उचलली आहेत. याचाच अनुभव शुक्रवारी पुन्हा एकदा आला.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण आणि अंबरनाथ दौऱ्यावर होते. अंबरनाथहुन कल्याणच्या दिशेने येत असताना शहाड रेल्वे स्टेशन समोर मनसेचे काही पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी थांबले होते. राज ठाकरे यांची गाडी शहाड रेल्वे स्टेशन समोर थांबली असता मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. या दरम्यान राज ठाकरे गाडीतून उतरताच त्यांचं लक्ष समोर असलेल्या रेल्वे स्टेशनच्या नावाच्या फलकावर गेलं.

ज्या ठिकाणी स्टेशनचे नाव मराठीत शहाड आणि हिंदीत सहद असा लिहिलं होतं. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना विचारले, "हा काय प्रकार आहे?" त्यावर कार्यकर्त्यांनी सांगितलं, "स्टेशनचं नाव मराठीत 'शहाड' लिहिलेल आहे आणि हिंदीमध्ये 'सहद' लिहलेलं आहे." कार्यकर्त्यांच्या या उत्तरावर राज ठाकरे म्हणाले, "हिंदी मध्ये पाहिजे कशाला?"

राज ठाकरेंची ही सूचना मनसे पदाधिकाऱ्यांना लगेच लक्षात आली. हिंदी सहद काढून टाकू असा शब्द पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना दिला आणि राज ठाकरे गाडीतून बसून रवाना झाले. त्यानंतर मनसे पदाधिकारी बंडू देशमुख यांनी शहाड रेल्वे स्थानकात जाऊन प्रबंधकला हिंदी मध्ये लिहिलेला शब्द दोन दिवसांत काढून टाकायचा अल्टीमेटम दिला. अखेर राज ठाकरे यांच्या आदेशानंतर अखेर रेल्वे प्रशासनाने स्टेशनचे नाव हिंदी शब्द 'सहद' हा काढून मराठीत 'शहाड' शब्द लिहिला आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृतीचं कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

म्हाडाचं घर घेताय? अर्ज करण्यापूर्वी ५ गोष्टी हमखास चेक करा, अन्यथा आयुष्यभर पश्चाताप

Shirdi Saibaba Temple : शिर्डी साई मंदिर प्रमुखावर भाविकाकडून भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप; सामाजिक कार्यकर्त्यांचे आत्मक्लेश आंदोलन

Operation Sindoor: नाना पाटेकरांचं कौतुकास्पद काम, 'त्या' कुटुंबांना केली लाखोंची मदत, ४८ शाळांचे घेतलं पालकत्व

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीस उद्या पुरग्रस्त भागाची पाहणी करणार

Gondia Medical Collage : गोंदिया शासकीय वैद्यकीय रुग्णालयात शॉर्टसर्किटने आग; रुग्णालयात नागरिकांची पळापळ

SCROLL FOR NEXT