Thakruli Railway Station Saam tv
मुंबई/पुणे

Thakruli Railway Station: आता काय म्हणावं? काल सरकत्या जिन्याचं लोकार्पण झालं; आज बंद पडला, मनसे आक्रमक

Thakruli Railway Station: सरकत्या जिन्याचे शिवसेना शिंदे गटाने लोकार्पण केले. मात्र, चौवीस तासांतच सरकता जिना पडल्याने शिंदे गटावर होत आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख

Thakurli Railway Station News: मुंबई आणि मुंबईनजीक सर्व रेल्वे स्टेशनवर दिवसेंदिवस प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. या वाढत्या गर्दीमुळे प्रत्येक रेल्वे स्टेशनवर आता सरकते जिने बसवण्याचे काम सुरू झाले आहे. याच सरकत्या जिन्याचे काम ठाकुर्ली स्टेशनवर पूर्ण झाले. या सरकत्या जिन्याचे शिवसेना शिंदे गटाने लोकार्पण केले. मात्र, चौवीस तासांतच सरकता जिना बंद पडल्याने शिंदे गटावर होत आहे. (Latest Marathi News)

ठाकुर्ली रेल्वे स्टेशनवरील सरकत्या जिन्याचे काल शिवसेना शिंदे गटाच्या वतीने लोकार्पण करण्यात आले होते. मात्र हा सरकता जिना २४ तासांतच बंद पडल्याने मनसेने शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. अर्धवट सरकत्या जिन्याचं लोकार्पण करण्यासाठी घाई का,असा सवाल मनसेने शिंदे गटाला केला.

ठाकुर्लीत सरकता जिना बंद पडताच मनसेने आक्रमक भूमिका घेतली. या जिन्याचं लोकार्पण करणारे खासदार श्रिकांत शिंदे यांना मनसेने उपहासात्मक सल्ला देखील दिला. 'चांगले पदाधिकारी नेमावे जेणेकरून अर्धवट कामाचे लोकार्पण करण्याची घाई होणार नाही, असा उपहासात्मक सल्ला मनसे शहर प्रमुख मनोज घरत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना दिला.

तर शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी आमचे खासदार काम करतात हे मनसेने कबूल केलं. त्याबद्दल त्यांचे मनसे अभिनंदन. आम्ही जी कामे करतो, त्याच कामाचे श्रेय घेतो. तांत्रिक बिघाडामुळे सरकता जिना बंद होता. तासाभरात जिना सुरु होईल, असे प्रतिउत्तर त्यांनी मनसेला दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेकाप आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या वडिलांचं निधन; सांगोला परिसरात शोककळा

Government Scheme: खुशखबर! महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला ₹३००० येणार; नवीन योजनेची घोषणा

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश भाऊंची बॉक्स ऑफिसवर हवा, दुसऱ्या सोमवारी 'राजा शिवाजी'नं किती कमावले?

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ₹३००० एकत्र मिळणार; लाभार्थी महिलांचा आकडा आला समोर, वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT