mns news  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai : खड्डेमय रस्त्याचे घातले श्राद्ध; मनसेच्या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा

मुंबईतील याच खड्ड्यांविरोधात पालिका अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाने हटके आंदोलन केले आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News : मुंबईतील रस्त्यांवरी खड्ड्यांच्या त्रासाला सामान्य नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.नागरिकांना त्याच खड्डेमय रस्त्यांचा वापर करावा लागत आहे. या खड्ड्यांवरून अनेक राजकीय पक्ष पालिकेला लक्ष्य करत आहेत. तर अनेक पक्ष, संघटना खड्ड्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन केले आहेत. मुंबईतील याच खड्ड्यांविरोधात पालिका अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाने हटके आंदोलन केले आहे. मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी चक्क खड्ड्यांचे श्राद्ध घातले आहे. (MNS News In Marathi)

मुंबईतील खड्ड्यांवरून मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत. लाखो रुपयांचा टॅक्स गोळा करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईकरांना (Mumbai) चांगले रस्ते उपलब्ध करून दिले जात नाहीत, असा आरोप मनसेने केला आहे. मुंबईच्या रस्त्यांवर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळते याला जबाबदार असणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांचा निषेध मनसेना केला. तसेच सर्वपित्री अमावस्या निमित्त खड्ड्यांचे श्राद्ध घालून मनसेने अंधेरी पूर्वेकडे हटके आंदोलन केले या आंदोलनाची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे.

श्राद्ध घातल्याने पीतरांना मोक्ष मिळतो असा समज आहे, याच भावनेतून मुंबईकरांना त्रास देणारे पालिका अधिकारी यांचा निषेध अंधेरीतील मनसे कार्यकर्त्यांनी केला. खड्ड्यांना श्राद्ध घालण्याचे काम अनोख्या आंदोलनातून मनसे अंधेरी पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांनी केले. यावेळी आंदोलकांनी खड्ड्यांमध्ये रांगोळी काढून,दिवे लावून आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले.

आंदोलकांनी यावेळी मुंबई महानगरपालिका विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केल्याचे पहायाला मिळाले. येत्या काही दिवसांमध्ये जर मुंबई महानगरपालिकांनी सर्व खड्डे बुजवले नाही तर पालिकेच्या विरोधात मनसे संपूर्ण मुंबईभरात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा रोहन सावंत यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात वेतन रखडल्यामुळे जळगाव महानगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

Urine Infection In Monsoon : पावसाळ्यात वारंवार होतेय युरिन इन्फेक्शन? मग 'या' चुका अजिबात करूच नका

Yavtmal : निकृष्ट सोयाबीन बियाण्यांवर मोठी कारवाई; १० प्रकरणांत गुन्हे, दोन कोटींच्या बियाण्यांच्या विक्रीवर बंद

ITR Filing 2026 : पगार १२.७५ लाखांपर्यंत असला तरीही भरावे लागेल टॅक्स, काय त्यामागचं नेमकं कारण?

Wi-Fi Tips : Wi-Fi चा स्पीड वाढवायचा आहे? ८ सोप्या ट्रिक्सने इंटरनेट होईल सुपरफास्ट

SCROLL FOR NEXT