पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं भाषण वादळी आणि तितकचं वादग्रस्त ठरलं आहे. त्यांच्या या भाषनामुळे त्यांच्यावरती विरोधकांकडून टीका केली जात आहे. मात्र, त्यांच्या या भाषणात सर्वाधिक वादग्रस्त ठरलेलं वक्तव्य म्हणजे मशिदीवरील भोंग्याविरोधातील आणि त्यांच्या याच वक्तव्यामुळे मुस्लीम समाजातील मनसे कार्यकर्ते नाराज झाल्याचं समोर येत आहे.
हे देखील पहा -
पुण्यात आगामी काळात मनसेला भगदाड पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी हालचाली करायला सुरुवात केली आहे. वसंत मोरे यांनी मनसेत कोणताही नाराजी नसल्याचा दावा केला आहे. मात्र, काल संध्याकाळी तातडीची बैठक बोलवाण्यात आली आहे. पुण्यातील मनसेचे काही नगरसेवकही राज ठाकरे यांच्या भूमिकेवर नाराज असल्याची चर्चा आहे.
या पार्शवभूमीवर वसंत मोरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, राज ठाकरेंची भूमिका चुकीची नाही. मला भूमिकेबाबतीत नाही तर कार्यकर्त्यांनी थोडं शांततेनं घेतलं पाहिजे असं वाटतं. आमचे काही कार्यकर्ते उत्साही असतात त्यामुळे त्यांनी लावली हनुमान चालीसा लावली. पण मी माझ्या प्रभागात असे काही करणारं नाही. सध्या रमजान सुरु आहे, मला माझ्या प्रभागात शांतता हवी आहे. म्हणून मी हनुमान चालीसा वगैरे काही लावणार नाही असे देखील वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान राज ठाकरेंच्या भाषणानंतर मनसेला पुण्यात दुसरा धक्का बसला आहे.कोंढव्यातील मनसे वाहतूक सेनेचे उपशहराध्यक्ष शेहेबाज पंजाबी यांचा मनसेचा राजीनामा दिला आहे. जिल्हा अध्यक्ष रवींद्र गारुडकर यांच्याकडे दिला राजीनामा दिला आहे. राज ठाकरे यांनी मुस्लिम समाजाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे नाराज होऊन त्यांना हे पाऊल उचललं आहे. या दोघांचीही मनधरणी करणार असल्याचं वसंत मोरेंनी स्पष्ट केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.